Next
‘टाटा प्रोजेक्ट्स’ करणार बीडीडी चाळीचे पुनर्वसन
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 05:08 PM
15 0 0
Share this story

पुणे :  बीडीडी (बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट) निवासी आणी कमर्शिअल संकुल (चाळी) या सध्या अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन इमारतींपैकी सर्वांत जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने टाटा प्रोजेक्ट्स, कॅपिसिटेल इन्फ्राप्रोजेक्ट आणि सीआयटीआयसी समूह यांचा समावेश असलेल्या संघाकडे सोपवला आहे. मुंबईच्या केंद्रस्थानी असलेल्या वरळी भागात असलेल्या या प्रकल्पामध्ये २६ दशलक्ष चौरस फूट भागाचा पुनर्विकास करावा लागणार आहे. यामध्ये १० हजार लोकांना काम मिळणार असून, आठ वर्षांच्या काळात विविध टप्प्यांमध्ये बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.

या पुनर्विकासाशी १० हजार कुटुंबांचा संबंध असून, त्यांना यामुळे नवीन घर, सुधारित जीवनशैलीचा लाभ होणार आहे; तसेच या प्रदेशात मोठा बदल घडून येणार आहे

याबद्दल बोलताना टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे म्हणाले, ‘हा भारतातील सर्वांत मोठा एकेरी मूल्याचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. शहराची आकाशरेखा (स्कायलाइन) बदलून टाकणाऱ्या या सामाजिकदृष्ट्या लाभदायी प्रकल्पामुळे मुंबईला जागतिक दर्जाचे शहर होण्यात मदत मिळणार आहे. टाटा प्रोजेक्ट्सने उच्च दर्जाच्या सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास करताना सुरक्षिततेच्या उच्च मानकांवर जो भर दिला आहे, त्याला पावती म्हणून या प्रकल्पाची जबाबदारी आमच्यावर सोपवली गेली आहे.’

हा महाकाय व्यापारी आणि निवासी पुनर्विकास प्रकल्प भारतातील सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. हा शहरी नूतनीकरणाचा प्रकल्प सामाजिक उन्नयनाच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा आहे. अन्य चाळ पुनर्विकास प्रकल्पांसाठी हा प्रकल्प आदर्श घालून देईल. परिसरात व्यापारी केंद्रांची निर्मिती करून आर्थिक उलाढाल वाढवण्याचे लक्ष्यही या प्रकल्पापुढे आहे. या प्रकल्पासाठी अंमलबजावणी एजन्सी म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) काम करणार आहे.

बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची (बीडीडी) स्थापना १९२०मध्ये तत्कालीन सरकारने केली. त्यावेळी वरळीतील २२ हेक्टर जागेवर एका महाकाय गृहनिर्माण आणि विकास योजनेची रचना करण्यात आली होती. त्यावेळी निर्माण झालेला जागेच्या टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी ८० खोल्यांच्या १२१ चाळींचे बांधकाम १९२१ ते १९२५ या काळात करण्यात आले. सध्या या प्रकल्पाच्या परिसरात नऊ हजार ७०० कुटुंबे राहतात. यातील सर्व वसाहत इमारती आता ९० वर्षांहून जुन्या झाल्या असून, त्यांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पुनर्विकासाचा निर्णय केला आहे.

या प्रकल्पाचा विकास मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा प्रादेशिक विभाग करत असून, येत्या आठ वर्षांत पाच टप्प्यांत बांधकाम पूर्ण होईल. या प्रकल्पामध्ये सुमारे ९८ पुनर्वसन आणि विक्रीच्या २२ ते ७५ मजल्यांपर्यंतच्या इमारती असून, यात २६ दशलक्ष चौरस फुटांचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ७२० ट्रांझिट शिबिरांची उभारणी करावी लागणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link