Next
‌प्रा. सागवेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
BOI
Monday, October 01, 2018 | 02:15 PM
15 0 0
Share this story


पुणे : तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या तंत्रशिक्षण विभागातील प्राध्यापक रविकांत तुकाराम सागवेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम इशा हॉटेलच्या सभागृहात झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी वैभव आवारे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती विभावरी दाभाडे, वडगाव मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ, पुणे महाराष्ट्र विद्या प्राधिकरण बालशिक्षण विभागाचे प्रमुख लक्ष्मणराव सुपे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक गणेश खांडगे, नगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, पदाधिकारी, मावळ पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी मावळ तालुक्यातील शाळा, विद्यालये, महाविद्यालयातील आदर्श शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. प्रा. सागवेकर हे १९८५ पासून इंद्रायणी महाविद्यालयात कार्यरत आहेत. शासनाने गठीत केलेल्या तंत्रशिक्षण विभागाच्या अनेक महत्त्वाच्या समित्या-उपसमित्यांवर तसेच तंत्रशिक्षण विभागाच्या अकरावी-बारावीच्या पुस्तक लेखन समितीचे प्रमुख म्हणूनही प्रा. सागवेकर कार्यरत आहेत. प्रा. सागवेकर हे शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी महत्त्वाच्या पदांवर विराजमान आहेत; तसेच काही विद्यार्थी उद्योजक म्हणूनही नावारूपाला आलेले आहेत.

‘मी हा पुरस्कार माझे आई-वडील यांना अर्पण करतो. खरे तर मी आजवर प्रामाणिकपणे केलेले काम आणि संस्थेने माझ्याबद्दल दाखवलेले विश्वास हे आजच्या पुरस्काराचे फलित आहे,’ असे मनोगत प्रा. सागवेकर यांनी व्यक्त केले.

प्रा. सागवेकर यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, ज्युनियर विभागाचे प्राचार्य प्रा. सुनील वोव्हाळ, संस्थेचे अधिकारी-पदाधिकारी, सर्व प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link