Next
‘चहा हा माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग’
‘वाघबकरी टी लाउंज’चे सचिन खेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, August 04, 2018 | 05:12 PM
15 0 0
Share this article:

पुण्यातील पहिल्या ‘वाघबकरी टी लाऊंज’चे उद्घाटन अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी कृष्णा देसाई, रसेश देसाई, पराग देसाई व योगेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे : ‘मी नाटकवाला आहे, त्यामुळे चहा हा माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. चहाची आपल्याकडे मोठी संस्कृती आहे’, अशा शब्दात सचिन खेडेकर यांनी आपले चहावरील प्रेम व्यक्त केले. 

भारतातील तिसऱ्या क्रमांकाची पॅकेज्ड चहा कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघबकरी टी ग्रुपचे पुण्यातील पहिले ‘वाघबकरी टी लाउंज’ आता फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन सचिन खेडेकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

प्रसिद्ध टी सोमिलियर व वाघबकरी टी ग्रुपचे कार्यकारी व्यवस्थापक पराग देसाई, व्यवस्थापकीय संचालक रसेश देसाई, कृष्णा देसाई, विपणन (मार्केटिंग) विभागाचे उपाध्यक्ष योगेश शिंदे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

‘लहान, मोठे, गरीब, श्रीमंत सगळे चहा पितात. आजच्या तरुण पिढीला हे लाउंज आकर्षित करेल. आमच्याकडे पार्ल्याला वाघ बकरीचे टी लाउंज आहे, ते प्रसिद्ध आहे. हे टी लाउंजदेखील  नक्कीच लोकप्रिय होईल,’ असा विश्वास  खेडेकर यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि गोवा या ठिकाणच्या यशानंतर आता पुण्यात ‘वाघबकरी टी लाउंज’ सुरू झाले असून, येथे चहाचे ४५पेक्षा अधिक प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लॅक टी, ग्रीन टी, ऑरगॅनिक टी, इन्स्टन्ट टी, आइस टी यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे. याबरोबरच विविध प्रकारच्या भारतीय व कॉन्टिनेन्टल शाकाहारी खाद्यपदार्थांचा आस्वादही ग्राहकांना घेता येणार आहे. 

या वेळी बोलताना पराग देसाई म्हणाले, ‘पुण्यातील ग्राहकांची लज्जतदार, उत्तम दर्जाच्या चहाची आवड लक्षात घेत आम्ही येथे हे टी लाऊंज सुरू करीत आहोत. फर्ग्युसन कॉलेज रस्ता या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी टी लाउंज आकारास आले आहे. वाघबकरी चहाच्या ब्रॅंडच्या स्थापनेत पुण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पुण्याशी आमचे भावनिक नाते आहे. हेच नाते अधिक गहिरे करण्यासाठी आम्ही हे टी लाउंज सुरू केले असून, यामुळे पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण चहाची संस्कृती एका नव्या उंचीवर पोहोचेल असा आम्हाला विश्वास आहे.’

‘चवीचे चाखण्यासाठी पुणेकर प्रसिद्ध आहेतच, त्यामुळे वाघबकरी टी लाउंज येथे नक्कीच लोकप्रिय होईल आणि भविष्यात आम्ही पुण्यात अधिक टी लाउंज उघडू,’ असा विश्वास या समूहाच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष योगेश शिंदे यांनी व्यक्त केला.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search