Next
क्लिअरट्रीपचा रोड शो
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 02:36 PM
15 0 0
Share this story

मुंबई : देशव्यापी भागीदार मोहिमेच्या यशाची आणखी एक पायरी म्हणून ‘क्लिअरट्रीप’ या भारतातल्या पर्यटन आणि करमणूक व्यवसायातल्या अग्रगण्य कंपनीने, लोणावळ्यात त्यांच्या सेवासामग्री पुरवणाऱ्या भागीदारांचा रोड शो आयोजित केला. क्लिअरट्रीप हॉटेल्स आणि त्यांच्या इतर उपक्रमांचे लोणावळा परिसरातील प्रतिनिधी यांनी या रोड शोला हजेरी लावली. 

या कार्यक्रमात कंपनीने उपस्थितांना कंपनीची तत्वे, उपक्रम, आवाका, वितरण व्यवस्था, प्रक्रिया आणि आगामी योजना यांची सविस्तर माहिती दिली. याचबरोबर कंपनीने तिच्या भागीदारांना व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांना जास्त समाधान देण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील, अशा काही नवीन कल्पना आणि प्रक्रियांबद्दल माहिती दिली. 

कार्यक्रमात कंपनीने त्यांच्या धोरणाबाबतच्या नव्या दृष्टिकोनांची ओळख करून दिली आणि लोणावळा परिसरातील स्थानिक जीवनाशी जुळणारे नवनवीन उपक्रम आखून, त्याद्वारे हॉटेल रूम्सचे किफायतशीर संयोजन करून उत्पन्न वाढवण्यासंबंधीच्या कल्पना अधोरेखित केल्या. अशा रोड शोजद्वारे, आपल्या सेवासामग्री पुरवणाऱ्या भागीदारांना जास्त सक्षम करून, उत्पादनसाखळी जास्त मजबूत करण्याच्या धोरणामुळे या व्यवसायातले आपले नेतृत्व क्लिअरट्रीप आणखी भक्कम करत आहे.

क्लिअरट्रीपचे हॉटेल्स उपाध्यक्ष अंकित रस्तोगी म्हणाले, ‘आमच्या व्यावसायिक भागीदारांपासून ते ग्राहकांपर्यंतच्या साखळीतील सर्व घटकांना फायदा व्हावा आणि समाधान मिळावे, हे आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे. याचसाठी परंपरागत सवलत-आधारित सेवांऐवजी, आम्ही जास्तीत जास्त आपुलकी आणि नावीन्य असणारे उपक्रम आमच्या ग्राहकांसाठी राबवत असतो. क्लियरट्रीपशी जोडले जाण्यामुळे सगळ्यांचाच किती फायदा आहे, हे सतत अधोरेखित करण्याच्या आमच्या धोरणाला अनुसरूनच हा विचार आहे. जास्तीत जास्त समाधान देणारी सेवा देऊन, व्यवसाय कसा वाढवावा याबाबत आमच्या सर्व भागीदारांशी सुसंवाद साधण्याच्या हेतूने, आम्ही हा रोड शो आयोजित केला होता.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link