Next
स्पार्क मिंडा टेक्निकल सेंटरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 02:42 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप’ (स्पार्क मिंडा) या जागतिक ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक कंपनीने ३० जानेवारी रोजी पुण्यातील चाकण येथील ‘स्पार्क मिंडा टेक्निकल सेंटर’ (एसएमआयटी) या अद्ययावत प्रकल्पाचे उद्घाटन केले.

स्पार्क मिंडा टेक्निकल सेंटरमुळे समुहाच्या सध्याच्या उद्योगांच्या तंत्रज्ञान विकासाच्या वाटचालीला चालना मिळेल आणि इलेक्ट्रॉनिफिकेशनच्या दृष्टीने घेतले जाणारे उपक्रम सक्षम केले जातील. ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील परिपूर्ण सिस्टीम सोल्यूशन पुरवठादार म्हणून समुहाचे असलेले अस्तित्व सक्षम करण्यासाठी व विस्तारण्यासाठीही यामुळे मदत होईल. बाजाराच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने साजेसे उपाय तयार करण्यासाठी, या केंद्रामध्ये नाविन्याला प्रोत्साहन दिले जाईल. यामध्ये कनेक्टेड, ऑटोनॉमस, इलेक्ट्रिफाइड मोबिलिटी सोल्यूशन्स, बॉडी कंट्रोल व मल्टि-फंक्शन कंट्रोलर्स, स्मार्ट सिक्युरिटी व व्हेइकल अॅक्सेस सोल्यूशन्स अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा स्वीकार करण्यासाठी संधींचा वेध घेतला जाईल. डीप लर्निंग, आर्टिफिशिअल इंटलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, स्मार्ट व्हेइकल तंत्रज्ञान, प्रोग्नोसिस व डायग्नॉसिस अशा भविष्यातील तंत्रज्ञानांच्या निर्मितीच्या दृष्टीनेही हे केंद्र विचार करेल. त्यामुळे हे केंद्र खऱ्या अर्थाने समूहाच्या ‘पॅशनने भारलेले’ या विचारांचे प्रतीक असेल आणि इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान क्षेत्रांतील पॅशनला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण जपणारे असेल.

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा समुहाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक मिंडा म्हणाले, ‘स्पार्क मिंडा टेक्निकल सेंटर सुरू करणे, हे ऑटोमोटिव्ह सब सिस्टीम्स क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडी घेण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त ठरणारे पाऊल आहे. एसएमआयटी समुहाची वाटचाल नव्या व भविष्यात्मक तंत्रज्ञानाच्या दिशेने करण्याबरोबरच समुहाच्या तंत्रज्ञानविषयक प्रवासाचे नेतृत्व करेल. संशोधन व विकासामध्ये आणखी वाढ करण्यासाठी व उत्पादने झपाट्याने बाजारात आणण्यासाठी येत्या तीन ते चार वर्षांत या केंद्राचा विस्तार करण्याचे आमच्या समूहाचे नियोजन आहे. प्रत्येक वाहनातील इलेक्ट्रॉनिक हा भाग वाढणार आहे, हे निश्चित व त्यामुळे एम्बडेड तंत्रज्ञानामुळे आम्हाला भविष्याच्या दृष्टीने मोठे पाठबळ मिळणार आहे.’

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा समुहाचे ग्रुप चीफ मार्केटिंग ऑफिसर एन. के. तनेजा म्हणाले, ‘ऑटोमोटिव्ह ग्राहकांना वाहनांकडून अधिकाधिक तंत्रज्ञानाची व आधुनिक वैशिष्ट्यांची अपेक्षा आहे. एसएमआयटी सुरू केल्यामुळे, हा समूह आमच्या ग्राहकांना तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी सक्षम होणार आहे. बाजारातील जागतिक दर्जाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमच्या पारंपरिक सेवांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल. एसएमआयटीमुळे भविष्यातील वाहनांबाबत असलेल्या तंत्रज्ञानाच्या अपेक्षांनुसार तंत्रज्ञानाची दिशाही ठरवली जाईल. यामुळे आम्हाला जागतिक ग्राहकांचा पसंतीचा तंत्रज्ञान भागीदार म्हणून आमच्या ब्रँडची प्रतिमा उंचावायलाही मदत होईल.’

स्पार्क मिंडा टेक्निकल सेंटरचे ग्रुप सीटीओ व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश डी. यांनी सांगितले, ‘तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेतृत्व व सिस्टीम पुरवठादार होण्यासाठीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असे अद्ययावत केंद्र सुरू करणे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आम्ही आमची विचारप्रक्रिया व धोरणे कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड व इलेक्ट्रिफाइड मोबिलिटी या ऑटोमोटिव्ह सबसिस्टीम्समधील जागतिक ट्रेंडनुसार बदलून, वाटचाल करण्यावर भर देत आहोत. आमच्या केंद्रातील नाविन्याने प्रेरित तरुण व हुशार मनुष्यबळाने या दिशेने काम करण्यास अगोदरच सुरूवात केली आहे.’

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा समुहाची परंपरा १९५८पासून आहे. आज स्पार्क मिंडाकडे जगभरात ३५ उत्पादन प्रकल्प आहेत व सोळा हजार व्यक्तींना थेट व हजारो व्यक्तींना अप्रत्यक्ष रोजगार दिला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये, स्पार्क मिंडा, अशोक मिंडा समुहाने जर्मनी व पोलंड येथे व्यवसाय संपादित केला आहे, तसेच इंडोनेशिया, व्हिएतनाम, उझबेकिस्तान, चेक रिपब्लिक येथेही ग्रीन-फिल्ड प्रकल्प ताब्यात घेतले आहेत. अलीकडच्या काळात मेक्सिको येथे नवा उत्पादन प्रकल्प सुरू करणे, तसेच कनेक्टेड मोबिलिटी व आयओटी सोल्यूशन्समध्ये आमच्या समुहाचे कौशल्य वाढवेल अशा ‘ईआय लॅब्ज इंडिया प्रा. लि.’चे संपादन करणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पुणे येथे डिए कास्टिंग प्रकल्प हा नवा ग्रीन-फिल्ड प्रकल्प सुरू केला जाणार आहे.

समुहाने डिझाइनिंग व उत्पादन क्षेत्रांमध्ये अमेरिकेतील स्टोनरिज, व्हास्ट, चीनमधील एसबीएचएपी, इटलीतील सिल्का, जपानमधील फुरुकावा व उझबेकिस्तानमधील उझअवतो यासारख्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांबरोबर अनेक महत्त्वाची व यशस्वी संयुक्त भागीदारी केली आहे. व्हीडब्लू समूह, बीएमडब्लू, डॅमलरी, फोर्ड, निस्सान अशा जागतिक कंपन्यांसह महिंद्रा, टाटा मोटर्स, अशोक लेलँड, होंडा, रेनॉल्ट निस्सान, मारुती सुझुकी, बजाज, यामाहा, टीव्हीएस अशा ओईएम सोबत समूह काम करत आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link