Next
‘नाइन एक्स’तर्फे ‘स्पॉटलॅम्प-ई’ वेबसाइट
प्रेस रिलीज
Saturday, September 15, 2018 | 04:17 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारताचे प्रमुख म्युझिक नेटवर्क नाइन एक्स मीडियाने स्पॉटलॅम्पई डॉट कॉमची (SpotlampE.com) घोषणा केली. हा चित्रपटबाह्य संगीतासाठी हा एक ओरिजिनल प्लॅटफॉर्म आहे. नवीन व मुख्य प्रवाहातील प्रतिभावान कलावंतांच्या ओरिजिनल ट्रॅक्सना स्पॉटलॅम्प-ई लेबलअंतर्गत तयार करून वितरित करण्यात येईल. ‘बाप्पा रे’ एक एक्सक्लुझिव्ह स्पॉटलॅम्प-ई ट्रॅक असून, गणेशोत्सवासाठी गायक शंकर महादेवन यांनी १२ सप्टेंबरला सादर केला. ‘बाप्पा रे’ नाइन एक्सएम, नाइन एक्स जलवा आणि नाइन एक्स झक्कासवर प्रसारित होईल.

स्पॉटलॅम्प-ईतर्फे ओरिजिनल संगीत तयार करण्यावर, त्याला वितरित करण्यावर आणि आर्टिस्ट मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित केले जाते. या व्यासपीठाच्या माध्यमातून चित्रपटबाह्य संगीताची रचना करून त्यातून कलाकारांचा स्तरही उंचावला जाणार आहे आणि त्यांना त्यांच्या सुयोग्य स्तरावर नेले जाईल. ‘कुडी तू पटाका’, ‘बिंगो मॅड अँजल्स साँग’, ‘बजने दो नाईट अँड डे’ यासह सर्व नाइन एक्स मीडिया ओरिजिनल्यस स्पॉटलॅम्प-ई लेबलचा भाग असतील.

स्पॉटलॅम्प-ईच्या लाँचप्रसंगी क्रिएटिव्ह कंटेंट आणि न्यू बिझनेस नाइन एक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सिनियर व्हाइस प्रेसिडेंट रजिता हेमवानी म्हणाल्या, ‘आम्हाला स्पॉटलॅम्प-ईच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. हे नॉन-फिल्म संगीत व कंटेंट तयार करण्याचे आणि त्याचे संवर्धन करण्याचे व्यासपीठ आहे. हा प्लॅटफॉर्म भारतभरात व जगभरात असलेल्या नवीन आणि प्रस्थापित कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी संधी प्रदान करेल. स्पॉटलॅम्प-ई संगीत प्रेमींना मोठ्या प्रमाणावर संगीत प्रतिभांना जाणण्यामध्ये मदत करेल.’

‘बाप्पा रे’विषयी बोलताना हेमवानी पुढे म्हणाल्या, ‘शंकर महादेवन यांच्यासोबत भागिदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ते एक अष्टपैलू गायक, संगीतकार व उत्कृष्ट एंटरटेनर आहेत आणि ते गणेश चतुर्थीच्या मंगलप्रसंगी Spotlampe.com च्या लाँचच्या रूपात ‘बाप्पा रे’ गाणे सादर करत आहेत. ‘बाप्पा रे’मध्ये गणेशोत्सवाच्या खऱ्या भक्तीला समकालीन शैलीचा बाज देण्यात आला आहे.’

या ट्रॅकविषयी बोलताना शंकर महादेवन म्हणाले, ‘गणेशोत्सवाचा पहिला दिवस गणेश चतुर्थी भारतात अत्यंत शुभ दिवसांपैकी एक मानला जातो आणि ‘बाप्पा रे’सारख्या ट्रॅकवर काम करण्याचा हा एक संस्मरमणीय अनुभव आहे. नाइन एक्स मीडियाच्या स्पॉटलॅम्प-ई सोबत माझी भागिदारी संस्मरणीय आहे. मला खरोखरच या गाण्यात मजा आली आणि मला खात्री आहे की, हे निश्चितच प्रत्येक वयाच्या गणेश भक्ताला आवडेल.’

‘बाप्पा रे’ या गाण्याला अमेय नाईक यांनी संगीत दिले आहे. स्पॉटलॅम्प-ईने निर्मित व दिग्दर्शित केले आहे. या गाण्याचे बोल परितोष वैष्णव यांचे आहेत. या संगीतमय म्युझिक व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला सामील करण्यात आले आहे. ‘बाप्पा रे’चे प्रमाशेन सोशल मीडिया आणि नाइन एक्सएम, नाइन एक्स जलवा आणि नाइन एक्स झक्कासवर करण्यात येईल. हा ट्रॅक या तीन चॅनेल्सवर संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान २३ सप्टेंबर २०१८ पर्यंत धुमधडाक्यात वाजवण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search