Next
महाजनादेश यात्रेच्या प्रचारार्थ डिजिटल चित्ररथ सज्ज
खासदार बापट यांच्या हस्ते उद्घाटन
BOI
Friday, September 13, 2019 | 04:20 PM
15 0 0
Share this article:

महाजनादेश यात्रेच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.

पुणे : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे सदस्य,  ज्येष्ठ पत्रकार व कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन नुकतेच पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. 

या वेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे, अजय खेडेकर, आदित्य माळवे, स्वप्नाली सायकर, राजू परदेशी, प्रल्हाद सायकर, सुभाष देशमुख, तेजस गाडे, विशाल सांडभोर, अमित सोनावणे, अनिल माने, समीर भुत्ते, सिध्दार्थ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


या वेळी खासदार बापट म्हणाले, ‘महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणेकरांच्या भेटीला येत आहेत. पुणेकर जनता त्यांच्या स्वागताला उत्सुक आहे. नागरिकांची आवड,  कल आणि सोय लक्षात घेऊन माने यांनी अत्यंत कल्पकतेने हा चित्ररथ तयार केला असून, या प्रभावी प्रचारतंत्रामुळे पुणेकरांचा अपेक्षेपेक्षाही उदंड प्रतिसाद या यात्रेस लाभेल, अशी खात्री वाटते.’  

माने म्हणाले, ‘संपूर्ण शहरात चार दिवस हा रथ फिरणार आहे. या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे, योजना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडक भाषणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. याबरोबरच शहराच्या कानाकोपर्याातून जे या यात्रेत सहभागी होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी यात्रेचा मार्ग, ठिकाण, वेळ अशी उपयुक्त माहितीदेखील या माध्यमातून देणार आहोत. हा वेगळा प्रयत्न पुणेकरांच्या पसंतीस उतरावा आणि अधिकाधिक पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे या यात्रेत सहभागी व्हावे, हाच यामागील उद्देश आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search