Next
मी अभिमन्यू
BOI
Thursday, December 27, 2018 | 10:14 AM
15 0 0
Share this story

घरात एकुलते मुल असले की साहजिकच लाडाकोडात वाढ होणे ओघानेच येते. डॉ. सतीशकुमार पाटील यांचा ‘मी अभिमन्यू’मधील नायकही असाच संपन्न घरातील एकुलता एक लेक. आई तर त्याला नजरेआडही करू देत नसे. शाळेतही हुशार विद्यार्थी. शिक्षकांचा लाडका मित्रपरिवारही भरपूर. वयात येण्यापूर्वीच वेदिका नावाच्या मुलीशी मैत्रीचे नाते जडलेले. दहावीतून अकरावीत शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. डॉक्टर होणार हा सर्वांचाच विश्वास. पण याच काळात पाय दुखावल्याचे निमित्त होऊन तो आजारी पडला. हा आजार साधासुधा नसून मांड्यांच्या कॅन्सरपर्यंत पोचला. मग सुरू झाला घर व दवाखाना असा पाठशिवणीचा खेळ.

आई आता रुग्ण मुलाचे सर्व काही करू लागली. वडील, आजी-आजोबाही मनोभावे त्याची सेवा करू लागले. शस्त्रक्रियेनंतर उठता-बसता, चालता येऊ लागले; मात्र जीवन पूर्वपदावर येते तोच फुफ्फुसात कॅन्सरच्या गाठी पसरलेल्या दिसल्या व पुन्हा एकदा कॉटवर हालचाल न करता पडून राहावे लागले. यातूनच मृत्यू समीप आल्याची चालूल लागलेल्या कॅन्सरग्रस्त तरुणाची कहाणी या कादंबरीतून वाचायला मिळते.

पुस्तक : मी अभिमन्यू
लेखक : डॉ. सतीशकुमार पाटील
प्रकाशक : डीएस बुक वर्ल्ड
पाने : १६८
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link