Next
‘अल्लाना इन्स्टिट्यूट’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, February 22, 2019 | 03:31 PM
15 0 0
Share this story



पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसतर्फे आयोजित केलेल्या ‘चेकमेट २०१९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज (२२ फेब्रुवारी) सकाळी हॉटेल अरोरा टॉवर्स येथे बेंगळुरू विमानतळाचे मनुष्य बळ विकास विभागाचे मुख्यधिकारी टी. सी. सजित यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी भूषविले. ‘अल्लाना इन्स्टिट्यूट’चे संचालक आर. गणेसन यांनी स्वागत केले. सामाजिक योगदानाबद्दल एस. मुरलीधरन यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. परिषदेचे हे ११ वे वर्ष होते. परिषदेत सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधांचे प्रकाशन या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



या प्रसंगी बोलताना सजीत म्हणाले, ‘भारतीय विमानतळाची सुरक्षा डोळ्यात तेल घालून, पूर्ण जबाबदारीने राखली जात आहे. विमानतळे पूर्ण सुरक्षित आहेत. प्रत्येक प्रवेशावर नजर ठेवली जाते. सुरक्षिततेचे नियम कडक करण्यात आले आहेत. त्यासाठी मानवी सुरक्षेबरोबर अत्याधुनिक तंत्राचा अवलंब केला जात आहे. सध्या सहा विमानतळांची जबाबदारी खासगीकरणातून देण्यात आली आहे. भावी काळात १४० विमानतळे खासगी होणार आहेत. दोन हजार विमाने देशात पुढील सात वर्षांत उपलब्ध होत आहेत. अत्याधुनिक व्यवस्थापन तंत्रे पाहता व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना कारकिर्दीच्या संधी उपलब्ध होत असून, व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने तयारी करावी.’



डॉ. इनामदार म्हणाले, ‘गेल्या पाच हजार वर्षांत झाली नव्हती इतकी प्रगती स्वातंत्र्योत्तर काळात झाली आहे. त्याबाबत न्यूनगंड बाळगण्यासारखी वस्तुस्थिती नाही. व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जगात नवी आव्हाने पेलली पाहिजेत.’

उद्योग जगतातील अनेक मान्यवर संशोधक, व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक या परिषदेत सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link