Next
‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एन्जेलिस’मध्ये तब्बूचा सन्मान
BOI
Friday, March 15, 2019 | 02:24 PM
15 0 0
Share this article:

अभिनेत्री तब्बूनवी दिल्ली : एप्रिल २०१९मध्ये लॉस एन्जेलिस याठिकाणी होत असलेल्या ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एन्जेलिस (IFFLA)’मध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेती बॉलीवूड अभिनेत्री तब्बू हिचा सन्मान केला जाणार आहे. या महोत्सवाचे हे १७वे वर्ष असून यंदा ११ ते १४ एप्रिलदरम्यान ‘लॉस एन्जेलिस’ येथील ‘बार्को इनोव्हेशन सेंटर’ याठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवाचे कार्यकारी संचालक ‘क्रिस्टिना मरौडा’ यांनी नुकताच महोत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन जाहीर केले. महोत्सवाचा अर्धा भाग हा महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा असणार आहे. महिलांच्या चित्रपटांचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल. यामध्ये अनामिका हकसर यांचा ‘टेकिंग द हॉर्स टू इट जलेबिज’, आदित्य विक्रम सेनगुप्ता यांचा ‘जोनाकी’, दार गै यांचा ‘नामदेव भाऊ इन सर्च ऑफ सायलेन्स’ आणि रितू सरीन यांचा ‘द स्वीट रिक्विम’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. 

अभिनेत्री तब्बूची भूमिका असलेला चित्रपट ‘अंदाधून’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. चित्रपट, लघूपट आणि माहितीपट अशा सर्व प्रकारांतील नऊ भाषांमधील कलाकृती या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय किर्ती कुल्हारी आणि नवीन कस्तुरीया यांचा लघूपट ‘माया’ याचे स्पेशल स्क्रिनिंग या महोत्सवात होणार आहे. 

‘गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही तब्बूचा सन्मान करण्याच्या विचारात होतो. यंदा ही योग्य वेळ आहे, असे ठरवून हा सन्मान करण्यात येणार आहे. तिचे आजवरचे काम, तिचे व्यक्तिमत्व, चित्रपटांव्यतिरिक्त एक माणूस म्हणून असलेली तिची ओळख या सर्व गोष्टी या महोत्सवातून उलगडण्यात येणार आहेत. सुंदर, स्वतंत्र मताची, निरनिराळ्या भूमिका वठवलेली, कामाशी तडजोड न करणारी अशी अभिनेत्री म्हणून तब्बूची ओळख आहे आणि ती तशीच आम्हीदेखील करून देणार आहोत’, असे मत महोत्सवाचे कार्यकारी संचालक क्रिस्टिना मरौडा यांनी व्यक्त केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search