Next
‘एमएसडीई’तर्फे पहिल्या बॅचचा गौरव
प्रेस रिलीज
Tuesday, April 03, 2018 | 02:59 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान यांनी जपानला दिलेल्या द्विराष्ट्रीय भेटीनंतर पेट्रोलिअम व नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास व उद्योजकता (एमएसडीई) मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २२ सेंडिंग ऑर्गनायझेशनचा व जपानसारखी कार्यक्षमता आपल्या देशातही आणण्यासाठी जपानमधील टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी पाठवलेल्या पहिल्या बॅचमधील इंटर्नचा गौरव केला.

या वेळी ‘एमएसडीई’चे सचिव डॉ. के. पी. कृष्णन, संयुक्त सचिव आशिष शर्मा आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) ईडी व सीओओ जयंत कृष्णा उपस्थित होते. या बॅचमुळे जपानमधील आधुनिक तंत्रज्ञान व भारतातील समृद्ध मनुष्यबळ यांच्यातील सहयोगाला यशस्वी सुरुवात झाली आहे.

या वेळी बोलताना ‘एमएसडीई’चे मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘पहिल्या बॅचचा गौरव केल्याचा आणि त्यातील प्रत्येकाची व्यक्तिशः भेट घेतल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे. ते आमच्या कार्यक्रमाचे ब्रँड अम्बेसेडर आहेत व भविष्यातील बॅचेससाठी प्रेरणादायी आहेत. ते भारतात परतल्यानंतर, अशा अत्यंत कुशल मनुष्यबळामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती येथे येतीलच, शिवाय ‘मेक इन इंडिया’ अभियानाला बळकटीही येईल. त्यांच्या यशासाठी माझ्या शुभेच्छा.’

‘या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सेंडिंग ऑर्गनायझेशनचे स्वागत आहे आणि ते दर्जेदार इंटर्न घडवतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्देशानुसार भारत ही कौशल्याच्या बाबतीत जगाची राजधानी बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल. जपानबरोबरच्या या कार्यक्रमामुळे ही केवळ सुरुवात झाली आहे. अन्य देशांबरोबरही आम्ही असा सहयोग करणार आहोत,’ असेही प्रधान यांनी या वेळी सांगितले.

कौशल्ये आत्मसात करण्याच्या आकांक्षेवर भर देत, ‘एमएसडीई’चे सचिव डॉ. कृष्णन म्हणाले, ‘गुणवत्ता व प्रमाण वाढवण्यावर स्कील इंडिया मिशनचा भर आहे आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आकांक्षा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. आजच्या कार्यक्रमामुळे, आपल्या देशातील तरुणांना कौशल्यविषयक क्रांतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने, मौल्यवान अनुभव साध्य केला जाईल. स्टायपेंड वाढवला जाईल व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण मिळेल.’

१५ विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचने ‘सीआयआय’च्या चेन्नईतील प्रकल्पात प्री-डिपार्चर प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यांना जपानमधील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादकाकडून इंटर्नशिप ऑफर लेटर मिळाले आहे. उत्पादन, गुणवत्ता विभाग, तांत्रिक विभाग आदी विभागांतील उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना या कार्यक्रमासाठी खास सहभागी करून घेतलेल्या स्थानिक जपानी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.

इंटर्न प्रामुख्याने दक्षिण तामिळनाडूतील ग्रामीण भागातील आहेत. ते समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील असून, त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक सरासरी उत्पन्न ४० हजार ते ८० हजार रुपये आहे. या कार्यक्रमाच्या गरजेनुसार, त्यांना सहा महिने ते एक वर्ष इतका अनुभव आहे. त्यापैकी अनेक जण उत्पादन क्षेत्रात काम करत असून, ते दरमहा आठ हजार ते १० हजार रुपये मिळवत होते.

या कार्यक्रमांतर्गत, आवश्यक बाबी वजा केल्यानंतर त्यांना दरमहा ६० हजार ते ६५ हजार रुपये मिळवता येतील. त्यामुळे, त्यांना मोठ्या प्रमाणात वित्तीय व प्रोफेशनल सहकार्य मिळेल आणि यामुळे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावेलच, शिवाय त्यांच्या कुटुंबांनाही मोठी मदत होईल.   

पेट्रोलिअम व नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास व उद्योजकता (एमएसडीई) मंत्रालयाने अंमलबजावणी करण्यासाठी अलीकडेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला सहभागी करून घेतले. भारत व जपान यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या परस्पर सामंजस्य कराराचा भाग म्हणून, ‘एमएसडीई’ने उमेदवारांची निवड करण्यासाठी जपानमध्ये जाण्यापूर्वी जपानी भाषेविषयी व कामाच्या नीतिमूल्यांविषयी प्रशिक्षण देण्यासाठी व संबंधित जापनिज रिसिव्हिंग व इम्प्लिमेंटिंग पार्टनर यांच्या सहयोगाने इंटर्नशिपची सुविधा देण्यासाठी सेंडिंग ऑर्गनायझेशन म्हणून २२ फर्मना नामांकित केले आहे. ‘टीआयटीपी’ हा अतिशय प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे व तो यशस्वीपणे राबवणे हे भारताचे लक्षणीय यश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search