Next
फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन
BOI
Saturday, July 07, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन हा म्युच्युअल फंडाचा प्रकार असून, नावाप्रमाणेच त्याची मुदत निश्चित असते. अन्य साधनांच्या तुलनेत यातून मिळणारा परतावा महागाई दरापेक्षा जास्त असू शकतो. या गुंतवणूक पर्यायाची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
...........
ज्यांना गुंतवणूक करताना जोखीम घ्यायची नसते, असे गुंतवणूकदार प्रामुख्याने बँक एफडी, पीपीएफ, सरकारी कर्जरोखे, पोस्टाच्या विविध योजना यांत गुंतवणूक करीत असतात; मात्र यातील पीपीएफ वगळता सर्व गुंतवणुकीतून मिळणारा रिटर्न (व्याज) करपात्र असल्याने करपश्चात मिळणारा रिटर्न (टॅक्स अॅडजस्टेड रिटर्न) हा बऱ्याचदा इन्फ्लेशन रेटपेक्षा (महागाई दर) कमी असल्याचे दिसून येते. हे टाळण्यासाठी एफएमपी हा एक चांगला पर्याय आहे. सामान्य गुंतवणूकदारास याबाबत फारशी माहिती नसल्याने हा पर्याय विचारात घेतला जात नाही.

एफएमपी हा क्लोज एन्डेड डेट म्युच्युअल फंड असून, वेगवेगळे म्युच्युअल फंड ही योजना ‘एनएफओ’द्वारे (न्यू फंड ऑफर) बाजारात घेऊन येतात. यातील गुंतवणुकीचा कालावधी दोन ते तीन दिवसांचाच असतो. ज्या दिवशी एफएमपी एनएफओ सुरू होतो त्याला ओपनिंग डेट व ज्या दिवशी गुंतवणुकीसाठी बंद होतो, त्याला क्लोजिंग डेट म्हणतात. या कालावधीतच या योजनेत गुंतवणूक करता येते. गुंतविलेली रक्कम योजनेच्या मुदतीनंतर परत केली जाते. याउलट अन्य डेट फंडात आपण केव्हाही गुंतवणूक करू शकतो. त्यातील  संपूर्ण किंवा अंशत: रक्कम आपल्याला हवी तेव्हा काढू शकतो. 

आत्ता लगेचच बाजारात येणार असलेले काही प्रमुख एफएमपी खालीलप्रमाणे आहेत.

या योजनेचा कालावधी कमी-अधिक असू शकतो. गुंतवणूकदाराला आपल्याला सोयीस्कर वाटणाऱ्या कालावधीच्या एफएमपी एनएफओमध्ये गुंतवणूक करता येते. यातील गुंतवणूक ‘एफएमपी’च्या कालावधीच्या जवळपास मुदत संपणार असणाऱ्या ‘डेट इन्स्ट्रुमेन्ट्स’मध्ये केली जाते. उदा. वरील ‘कोटक एफएमपी’चा कालावधी ११६२ दिवसांचा आहे. यामुळे यातील गुंतवणूक ११६२ दिवसांच्या जवळपास मुदत संपणार असणाऱ्या कर्जरोख्यांत केली जाईल. ९२ दिवसांचा कालावधी असणाऱ्या ‘आयडीएफसी एफएमपी’मधील गुंतवणूक ९० ते ९२ दिवसांनी मुदत संपणार असणारे कमर्शियल पेपर अथवा एसीडी यांसारख्या मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्समध्ये केली जाऊ शकेल. यात अन्य डेट म्युच्युअल फंडाप्रमाणे सिक्युरिटीजची खरेदी-विक्री वरचेवर होत नसल्याने अन्य डेट फंडांच्या तुलनेने एक्स्पेन्स रेशो कमी असतो. 

दुसरे असे, की ‘एफएमपी’चा रिटर्न इंडिकेटिव्ह असतो व ‘एफएमपी’च्या कालावधीनुसार कमी-अधिक असतो. तसेच संबंधित कालावधीसाठी अन्य डेट इन्स्ट्रुमेन्ट्सवर मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा थोडा जास्त असतो. प्रत्यक्षात मिळणारा रिटर्न इंडिकेटिव्ह रिटर्नपेक्षा कमी-अधिक असू शकतो.

आता आपण बँक एफडी व ‘एफएमपी’मधील फरक पाहू. 

एफएमपी योजनेत गुंतवणूक कोणी करावी?
ज्यांना अन्य डेट इन्स्ट्रुमेन्ट्सपेक्षा जास्त रिटर्न अपेक्षित आहे व थोडी रिस्क घेण्याची तयारी आहे, तसेच फारश्या लिक्विडिटीची आवश्यकता नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे; मात्र यात गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने हे लक्षात घेतले पाहिजे, की इंडिकेटिव्ह रिटर्न मिळेलच असे नाही. कारण बाजारातील व्याजदरांत होणाऱ्या बदलानुसार रिटर्न कमी-अधिक होऊ शकतो. शिवाय यातील रक्कम मुदतीपूर्वी सहजगत्या काढता येत नाही.

एवढे मात्र खरे, की गुंतवणुकीचा हा पर्याय विचारात घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. बाजारात सध्या कोणत्या म्युच्युअल फंडांचे एफएमपी एनएफओ गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shilpa Mandhre About 231 Days ago
Thanks for detailed information about Fixed Maturity Plan. Very useful.
0
0
A.k.kulkarni About 231 Days ago
Liked your information.can we gate fix income from this
0
0
V K Bhide About 231 Days ago
Very good information. Very useful. Under the present uncertainty, senior citizens are not willing to take risks. Thank you prof Kulkarni
0
0

Select Language
Share Link