Next
बाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग
BOI
Sunday, April 22 | 03:45 AM
15 0 0
Share this story

सोप्या आणि ललित शैलीतून मनोवेधकपणे विज्ञानाचा वेध घेणारे बाळ फोंडके, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ज्ञ अशोक केळकर आणि ‘इंग्लिश कादंबरीचा जनक’ मानला गेलेला हेन्री फिल्डिंग या साहित्यिकांचा २२ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......  
गजानन पुरुषोत्तम फोंडके 

२२ एप्रिल १९३९ रोजी जन्मलेले गजानन पुरुषोत्तम ऊर्फ बाळ फोंडके हे भाभा अणुसंशोधन केंद्राचे निवृत्त संशोधक आणि विज्ञान कथालेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत विज्ञान पोहोचवण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, मासिकं, दिवाळी अंक अशा अनेक माध्यमांतून ते आपल्या ललित शैलीद्वारे, मनोवेधकपणे विज्ञानाचा प्रसार करत असतात. 

अज्ञात अनामिकांचे कर्तृत्व, अंगदेशाचा वजीर - जनुकं, अंगदेशाचा राजा - मेंदू, अंगदेशाच्या लढाया - रोगप्रतिकारशक्ती, गर्भार्थ, इंद्रधनुष्य, जंतर मंतर, जावे विज्ञानाच्या गावा, का?, कसं?, काय?, कुठे?, केव्हा?, किती?, कोण?, ना पूर्व ना पश्चिम, ती आणि तो, तीन पायांची शर्यत, विज्ञान नवलाई - भूगोल, विज्ञान नवलाई - खगोल, विज्ञान प्रपंच, विज्ञान नवलाई - अंतराळ, विज्ञान नवलाई - आपले पूर्वज, विज्ञान नवलाई – पशु-पक्षी, विज्ञान नवलाई - प्राणिजगत, विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण (३ खंड), व्हर्च्युअल रिअॅलिटी, येरे येरे पावसा, अज्ञात आइनस्टाइन, अघटित, अंतरिक्ष भरारी, अणूरेणू, चंद्र, सायबर कॅफे, द्विदल, ग्यानबाचं विज्ञान, कालवलय, कर्णपिशाच्च, खिडकीलाही डोळे असतात, मनाचे रहस्य, ऑफ लाइन, पृथ्वी, सौरमालिका, सुगरणीचं विज्ञान, सूर्य, विश्वातील सजीवसृष्टी, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(बाळ फोंडके यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

अशोक रामचंद्र केळकर 

२२ एप्रिल १९२९ रोजी पुण्यात जन्मलेले डॉ. अशोक रामचंद्र केळकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ज्ञ आणि साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात. ‘भाषा आणि जीवन’ या मराठी अभ्यास परिषदेच्या नियतकालिकाचे ते प्रमुख संपादक होते. अमेरिका, नेपाळ, ऑस्ट्रिया, जर्मनी, इंग्लंड, पोर्तुगाल, रशिया, कॅनडा, अशा अनेक देशांमध्ये झालेल्या भाषेशी संबंधित चर्चासत्रांमध्ये त्यांचा सहभाग असे. 

अमेरिकेच्या कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी ‘भाषाविज्ञान व मानववंशशास्त्र’ या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली होती. सध्या प्रचलित असणाऱ्या १०+२+३ या शिक्षणपद्धतीचा अवलंब त्यांच्याच शिफारशीवरून झाला होता. 

मराठी भाषेचा आर्थिक संसार, प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा, वैखरी : भाषा आणि भाषा व्यवहार असं त्यांचं लेखन गाजलं होतं. ‘रुजवात’साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 

त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

२० सप्टेंबर २०१४ रोजी त्यांचं निधन झालं.
........

हेन्री फिल्डिंग
२२ एप्रिल १७०७ रोजी सॉमरसेटमध्ये जन्मलेल्या हेन्री फिल्डिंगला ‘इंग्लिश कादंबरीचा जनक’ मानण्यात येतं. त्याने लेखनाची सुरुवात नाटकं लिहून केली होती. पंचवीसेक नाटकं त्याने लिहिली होती. त्यांना भरभरून यश जरी मिळालं नसलं, तरी ‘द ऑथर्स फार्स’, ‘रेप अपॉन रेप’, ‘द लेटर रायटर्स’, ‘द मॉडर्न हसबंड’, ‘द लॉटरी’ यांसारख्या नाटकांतल्या त्याच्या लेखनाचं कौतुक झालं होतं. 

त्याचं लेखन खरं गाजलं ते त्याच्या कादंबऱ्यांमधून! शॅमेला, अमेलिआ, जोसेफ अँड्र्यूज या त्याच्या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या; पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘टॉम जोन्स’ कादंबरीमुळे! १७४९ सालची ही विनोदी ढंगाची कादंबरी तुफान खपली आणि एका वर्षातच तिच्या चार आवृत्त्या निघाल्या होत्या. या कादंबरीवर सिनेमेही निघाले होते. 

आठ ऑक्टोबर १७५४ रोजी त्याचा लिस्बनमध्ये मृत्यू झाला.

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link