Next
‘सहकार पॅनल विजयी करा’
प्रेस रिलीज
Wednesday, February 28 | 05:10 PM
15 0 0
Share this story

आमदार सुजितसिंह ठाकूरमुंबई : ‘महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे,’ असे आवाहन भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी येत्या चार मार्च २०१८ रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीत भाजप सहकार आघाडीचे प्रदेश प्रभारी व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवाजीराव नलावडे (मुंबई), ‍‍‍अॅड. सुहास तिडके (विदर्भ), अशोकराव जगताप (मराठवाडा), हिरामन सातकर (पश्चिम महाराष्ट्र), भाई वांगडे (मुंबई), डॉ. संतोष कोरपे (विदर्भ) आदी सहकारातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन या निवडणुकीत सहकार पॅनल उभे केले आहे.

‘राज्यातील सहकाराला शिक्षण-प्रशिक्षण देण्याचे काम महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे असून, सद्यस्थितीत संघाची दुरावस्था झालेली आहे. ती दूर करून सरकारच्या माध्यमातून सहाकारी संघाला वैभवशाली दिवस आणून सहकार सुदृढ करण्यासाठी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना कपबशी, छत्री, नारळ व तराजू चिन्हावर मतदान करून विजयी करा’, असे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link