Next
‘टाटा मोटर्स’तर्फे देशभरात मोफत मान्सून चेक-अप शिबिरे
प्रेस रिलीज
Saturday, July 20, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टाटा मोटर्सतर्फे १५ जुलैपासून देशभरात मोफत मान्सून चेक-अप मोहिम राबवायला सुरुवात झाली असून ती ११ दिवस म्हणजेच २५ जुलैपर्यंत चालणार असल्याचे टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले. मोफत चेक-अप्ससोबतच कंपनीतर्फे या मोहिमेत सर्व डीलरशीप नेटवर्कमध्ये विविध योजना आणि सवलतीही दिल्या जाणार आहेत. या वार्षिक उपक्रमात टाटा मोटर्स सर्व्हिस ब्रँडची वृद्धी आणि विविध ग्राहककेंद्री योजनांचा प्रसार करण्याचाही कंपनीचा विचार आहे.

टाटा मोटर्सच्या कस्टमर केअर विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक सुभाजित रॉय म्हणाले, ‘टाटा मोटर्सच्या व्यवसायातील गुरुकिल्ली आहे ग्राहक सेवा. काळाच्या ओघात या सेवांमध्ये फार बदल झाले आहेत. बाजारपेठेतील बदलत्या मागण्यांना अनुरूप विविध सेवा आम्ही सादर केल्या आणि स्पर्धात्मक व अधिकाधिक दर्जेदार सेवा देत ग्राहकांना वेळेत सेवा दिल्या गेल्या. परिणामी जेडी पॉवर कस्टमर सर्विस इंडेक्समध्ये आम्ही दुसरा क्रमांक कायम राखू शकलो.’

‘मोफत मान्सून चेक-अप कॅम्प्सच्या माध्यमातून आम्ही सर्व टाटा मोटर्स प्रवासी गाड्यांना आणि युटिलिटी व्हेइकल मालकांना या पावसाळ्यात सेवा देणार आहोत. ग्राहकानुभव वृद्धिंगत करण्यासाठी विक्री पश्चात सेवा अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि ग्राहकांची मते जाणून घेण्यासाठी व त्यांच्या आकांक्षा समजून घेण्यासाठी वार्षिक सर्विस कॅम्प उत्तम व्यासपीठ असतात, यावर आमचा विश्वास आहे,’ असे रॉय यांनी सांगितले.

या योजनेचा भाग म्‍हणून संबंधित काळात ग्राहकांना रोडसाइड असिस्टंस (आरएसए) योजना, सुटे भाग, लेबर तसेच ऑइल टॉप-अप आणि ऑइल बदलणे यावर सवलत दिली जाणार आहे. पावसाळ्यातील या योजनेत विकलेल्या आरएसए पॉलिसीजवर ग्राहकांना १० टक्के सवलतही मिळू शकते; तसेच ऑइल बदलणे किंवा टॉप-अपवर वैयक्तिक विभागातील ग्राहकांना १० टक्के आणि फ्लीट सेगमेंट ग्राहकांना १५ टक्के सवलत मिळेल.

देशभरातील निवडक डिलरशीप्समध्ये नव्या कारही डिस्प्लेसाठी ठेवण्यात येणार आहेत; तसेच लोन कम एक्स्चेंज मेळा आणि जुन्या गाड्यांची मोफत तपासणी व इतर अनेक आकर्षक सवलतींचा लाभ ग्राहकांना घेता येईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search