Next
‘नृत्यात भावछटांची मुक्तहस्ते उधळण आवश्यक’
पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे मत
BOI
Monday, March 11, 2019 | 02:03 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘कोणतीही कला सादर करणाऱ्या कलाकाराच्या मनात नेहमी विविध भावछटा उमटतात. नृत्यामध्ये या भावछटा रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे प्रत्येक नृत्य कलाकाराने आपल्या भावछटांची मुक्तहस्ते उधळण केल्यास ते सादरीकरण सर्वोत्तम ठरते,’ असे मत किराणा घराण्यातील गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी व्यक्त केले.

नवी दिल्लीतील कथक केंद्राच्या वतीने व इंडियन इन्स्टिट्यूटस ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे (आयसर) आणि ऋजुता सोमण कल्चरल अकादमी यांच्या सहयोगाने या दोन दिवसीय कथक उत्सवाचे आयोजन ‘आयसर’च्या सी. व्ही. रमण सभागृहात करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे, सुजाता नातू, मनीषा साठे, नीलिमा आध्ये, प्राजक्ता राज, परिमल फडके आदी मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगना समीक्षा शर्मा यांच्या भगवान शंकर यांच्या विविध रूपांवर आधारित कथक नृत्याने झाली. त्यानंतर त्यांनी कृष्णलीला व काही पारंपरिक रचना सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली.

त्यानंतर नवी दिल्लीतील कथक केंद्रातील कलाकारांनी ज्येष्ठ नृत्यांगना मालती श्याम यांनी दिग्दर्शित केलेले नृत्य उल्हास आणि नृत्य बसंत हे बहारदार कार्यक्रम सादर केले. नीलाक्षी खांडकर, जया भट, क्षिप्रा जोशी, पार्थ मोंडल व विश्वदीप यांनी नृत्याचे सादरीकरण केले. 

राजेंद्र गंगाणी
कार्यक्रमाचा समारोप कथक केंद्राचे राजेंद्र गंगाणी यांच्या सादरीकरणाने झाला. त्यांनी पारंपरिक रचनांसह काही बंदिशीही सादर केल्या. त्यांना योगेश गंगाणी, राहुल विश्वकर्मा (तबला), समीलुहा खान, ब्रिजेश मिश्रा (गायन), गुलाम वारिस (सारंगी) आणि अतुल शंकर (बासरी) यांनी साथसांगत केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link