Next
सेवाग्राम, सिंदी रेल्वे येथे पायाभूत सुविधांचा लोकार्पण सोहळा
प्रेस रिलीज
Saturday, September 09, 2017 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

सिंदी रेल्वे स्टेशन येथील लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार रामदास तडस. सोबत नगराध्यक्षा संगीता शेंडे, उपनगराध्यक्ष वंदना डखरे, सिंदी रेल्वे येथील स्टेशन मास्टर किशोर मेश्राम, नगर पालिकेच्या गटनेत्या अजया साखरे, सभापती प्रकाश मेंढे आदी मान्यवर.सेवाग्राम : केंद्र शासनाच्या रेल्वे बजेटमध्ये वर्धा लोकसभेसाठी मंजूर असलेल्या पायाभूत सुविधांचा लोकार्पण सोहळा वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

सेवाग्राम येथे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आवागमन करत असतात. त्यातून प्रवास करणाऱ्या वृद्ध व दिव्यांग व्यक्तींना लिफ्टअभावी त्रास सहन करावा लागतो; तसेच सिंदी रेल्वे येथे फालत क्रमांक १ व २ यांना जोडणारा पादचारी पूल नसल्याने अनेक अपघात होत असतात. या दोन्ही प्रमुख मागण्यांची दाखल घेऊन खासदार तडस यांनी रेल्वे अर्थसंकल्पात ही कामे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले होते.

परिणामी सेवाग्राम व सिंदी रेल्वे येथील कामे कालबद्ध वेळेत पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार तडस यांनी विकास कामांबद्दल कटिबद्ध असल्याचे नमूद केले आणि नागपूर रेल्वे विभागीय समिती अध्यक्ष या नात्याने केंद्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून अधिक जोमाने प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

सेवाग्राम येथील पायाभूत सुविधांचे नारळ वाढवून लोकार्पण करताना खासदार रामदास तडस.सेवाग्राम येथील वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंचलित लिफ्टच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक अजय दानीयाल, वरिष्ठ अभियंता नामदेव रबडे, सेवाग्राम येथील स्टेशन मास्टर जे. के. शर्मा, उप अभियंता पंकज धावरे, श्री. पुष्पलवार, श्री. चावरे, श्री. पांडे, श्री. तिवारी, सोशल मिडिया सेल संयोजक हरीश तडस, भाजपचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

सिंदी रेल्वे फालत क्रमांक १ व २ यांना जोडणाऱ्या उपरी पादचारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सिंदी रेल्वे येथील नगराध्यक्षा संगीता शेंडे, उपनगराध्यक्ष वंदना डखरे, सिंदी रेल्वे येथील स्टेशन मास्टर किशोर मेश्राम, नगर पालिकेच्या गटनेत्या अजया साखरे, सभापती प्रकाश मेंढे, सभापती पुष्पा सिर्सो, सभापती वंदना मदनकर, न.प. सदस्य वंदना सेलूकर, किशोर बोंगाडे, बाबारावजी बेलखेडे, सुधाकर घवघवे, भाजप अध्यक्ष, सिंदी रेल्वे, सदस्य ओमप्रकाश राठी, नंदू वैद्य, श्री. चावरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search