Next
‘इंडिया स्टोरेज फोरम’द्वारे धान्य सुरक्षित
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 01:09 PM
15 0 0
Share this storyपुणे :
एकीकडे देशातील धान्य उत्पादनात मोठी वाढ होत आहे आणि दुसरीकडे ते धान्य साठवण्याच्या अयोग्य पद्धतीमुळे वायाही जात आहे. धान्याचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी क्राँप केइर फेडरेशन (सीसीएफ), एंटोमोलाँजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (एमपीकेव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने पिकपूर्व व नंतर किटकनाशक आणि अन्न सुरक्षेचे उपाय यावर तीन दिवसांची परिषद ‘एमपीकेव्ही’ येथे भरवण्यात आली.

या वेळी इंडिया स्टोरेज फोरमची स्थापना करण्यात आली. याचे मुख्य संरक्षक म्हणून यूपीएलचे प्रबंध निदेशक रज्जू श्रॉफ यांची नियुक्ती करण्यात आली. शेतीच्या संबंधित सर्व संस्था म्हणजेच शेती विद्यालये, भंडार कंपन्या, कृषी उद्योग कंपन्य, शास्त्रज्ञ यांना एकाच व्यासपीठावर आणून देशात होत असलेल्या अन्नाच्या नासाडीला रोखणे हे इंडिया स्टोरेज फोरमचे उद्दिष्ट्य आहे.

या परिषदेत ३५० कृषी विद्यार्थी, ४५० शेतकरी, कृषी उद्योग आणि कृषीशास्त्रज्ञांनी सक्रीय सहभाग घेऊन धान्य सुरक्षेसंबंधीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली; तसेच प्रदर्शनाद्वारे धान्याचे संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिकही दाखवले.

याबरोबरच ‘जागृत किसान खुशहाल किसान’ मोहिमेअंतर्गत किटकनाशकांमुळे कोणतीही विषबाधा होऊ नये यासाठी किटकनाशकांचा योग्य वापर व वापरानंतर किटकनाशकाचे डबे व इतर वस्तू कशा नष्ट कराव्यात याची माहिती दिली.

धान्य योग्य पद्धतीने साठवून शेतकऱ्याला योग्य नफा मिळावा हे या मोहिमेचे लक्ष्य असल्याचे इंडिया स्टोरेज फोरमच्या कार्यकारी समितीचे सदस्य उज्ज्वल कुमार यांनी सांगितले. ‘धान्य योग्य पद्धतीने न साठवल्यामुळे ३० टक्के धान्य वाया जाते; तसेच शेतकऱ्याचा तोटा होतो आणि विश्व अन्नसुरक्षेत अडथळे येतात. या मोहिमेद्वारे आम्ही शेतकरी, विद्यार्थी, गृहिणी, धान्य साठवण उद्योग आणि अन्न उत्पादनसंबंधी प्रत्येकास धान्य साठवण्याच्या शास्त्रीय मार्गांची माहिती देणार आहोत,’ असेही ते म्हणाले.

‘आज देशात जादा धान्य उत्पादनाची गरज नाही, तर जे धान्य उत्पादित होत आहे त्याचे योग्यरितीने रक्षण होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने या प्रदर्शनात अन्नसुरक्षेसंबंधी कंपन्यांनी अत्याधुनिक उपकरणांद्वारे धान्याची नासाडी कशी रोखता येते; तसेच रसाायनामचा वापर सुरक्षितरित्या कसा करावा हे शिकवले,’ अशी माहिती उज्ज्वल कुमार यांनी दिली.

या वेळी धान्य साठवण आणि किडीच्या समस्येवर शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांची उत्तरेही मिळवली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link