Next
‘सोनी’ची मराठी वाहिनी सुरू
BOI
Monday, August 20, 2018 | 03:05 PM
15 0 0
Share this article:

‘सोनी मराठी’ वाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. सिंग व सोनी मराठीचे व्यवसाय प्रमुख अजय भाळवणकर.
मुंबई : ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया’ने (एसपीएन) मराठी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला असून, १९ ऑगस्टपासून ‘सोनी मराठी’ ही नवीन वाहिनी सुरू केली आहे. 
 
‘सोनी मराठी’वाहिनीवर सध्या वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषयमांडणी असलेल्या नऊ कथा मालिका (काल्पनिक) आणि दोन  कथाबाह्य कार्यक्रम (सत्यघटनांवर आधारित) सादर करण्यात येणार आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएन) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. सिंग म्हणाले, ‘अतिशय वेगाने विकसित होणाऱ्या मराठी मनोरंजन क्षेत्रात, एसपीएनच्या सीमा रुंदावणारे सोनी मराठी हे नवीन पाऊल जाहीर करताना आम्हाला नक्कीच खूप आनंद होत आहे. एसपीएन समूहासाठी मनोरंजन हा नेहमीच एक अग्रस्थानी गणला गेलेला विषय आहे आणि म्हणूनच आमच्या ‘विणूया अतूट नाती’ ह्या मूळ विचाराशी एकनिष्ठ रहात सर्व वयोगटांना आपलेसे वाटणारे, जुन्या परंपरांना नव्या दृष्टीकोनातून पाहणारे विषय तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत.’

सोनी मराठीचे व्यवसाय प्रमुख अजय भाळवणकर म्हणाले, ‘महाराष्ट्राला संस्कृतीची आणि विचारांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. या महाराष्ट्र देशासाठी एक नवीन मनोरंजन वाहिनी सुरू करणे आमच्यासाठी जेवढं आव्हानात्मक होतं तेवढंच आणि अभिमानचं होतं. मराठी प्रेक्षकांनी कसदार विषयांना नाटक व चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच साथ दिली. त्याच प्रकारचे कसदार विषय आपल्या रोजच्या टीव्ही माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या नवीन कलाकृती मराठी प्रेक्षक आनंदाने स्वीकारतील अशी आम्हाला खात्री आहे.’

‘सोनी मराठी’ सर्व मुख्य डायरेक्ट टू होम (डीटीएच) आणि डिजिटल केबल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search