Next
रोटरी क्लबतर्फे ‘जलोत्सवा’चे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 06:24 PM
15 0 0
Share this article:

‘जलोत्सव २०१८’ बाबत माहिती ‘देताना संयोजक सतीश खाडे.समवेत गणेश जाधव, उदय कुलकर्णी, दीप्ती पुजारी, नितीन चौरे, सुजाता कुलकर्णी, दिनकर पळसकर, अशोक भंडारी आदी

पुणे : ‘रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३१’ यांच्यावतीने २० मार्च ते २२ मार्च  या तीन दिवसीय ‘जलोत्सव ’ (वॉटर फेस्टीव्हल) चे आयोजन करण्यात आले आहे’, अशी माहिती ‘रोटरी प्रांत पुणे ३१३१’चे प्रकल्प संचालक आणि ‘जलोत्सव’ चे संयोजक सतीश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी  गणेश जाधव, उदय कुलकर्णी, दीप्ती पुजारी, नितीन चौरे, सुजाता कुलकर्णी, दिनकर पळसकर, अशोक भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘पुण्यातील दहा रोटरी क्लब एकत्र येऊन हा जलोत्सव आयोजित करीत आहेत. या तीन दिवसीय जलोत्सवाचे उदघाटन मंगळवारी, २० मार्च रोजी दुपारी दीड वाजता साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. ‘जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे हा कार्यक्रम होईल. जलोत्सवातील मान्यवरांची मार्गदर्शक व्याख्याने दुपारी दीड ते रात्री आठ या वेळेत होणार आहेत.’ अशी माहिती खाडे यांनी दिली.

 ‘महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक रोटरी क्लब आणि पंचवीसहजारांहून अधिक रोटेरियन्सनी उभा केलेला सकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधीत्व  हा जलोत्सव करतो. शहरी व ग्रामीण नागरिकांमध्ये जल साक्षरता निर्माण व्हावी, तसेच उद्योग, प्रशासन, धोरणकर्ते, शेतकरी, रोटेरियन्स आणि पुढच्या पिढीसाठी या जलोत्सवाच्या माध्यमातून जल साक्षरता निर्माण होऊन हे कार्य पुढे चालू राहावे या प्रमुख उद्देशाने या ‘जलोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे, असे खाडे यांनी  नमूद केले.

‘या महोत्सवामध्ये साहित्य आणि जलसाक्षरता, पाणी आणि अंधश्रद्धा, कुरणशेती, वॉटर ऑलिंपियाड, बारीपाडा विकास मॉडेल, क्षारशेती,  भारतीय संस्कृती आणि मान्सून, पुण्याच्या पाण्याचे नियोजन, दुष्काळमुक्त बुलढाणा, विनावीज- विनाखर्च पाण्याचा पुनर्वापर या विषयांचा समावेश आहे.  महापौर मुक्ता टिळक, उपेंद्र घोडे, डॉ. धनंजय नेवाळकर, प्रदीप पुरंदरे, चैत्राम पवार, दिनेश कुंवर, डॉ. श्रीकांत गबाले, भरत व्हयगाले, दिगंबर डुबल, सतीश वैजापूरकर, मयुरेश प्रभुणे, शिवानी चौगुले, अरुण म्हात्रे, शांतिलाल मुथा, डॉ. समीर शास्त्री, आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पाणी विषयक क्षेत्रात काम केलेल्या स्वयंसेवी संस्थाचा या वेळी गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रोटरी क्लब्सनी  जलसंवर्धनासाठी  केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल. उल्लेखनीय कार्य करणार्याा अनेक ‘रोटरी क्लब’ चा सन्मान देखील करण्यात येणार आहे. महोत्सवाची सांगता रोटरी वॉटर ऑलिंपियाडमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाने   होईल. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापिठाचे कुलगुरू  डॉ. नितीन करमळकर  व उद्योजक किशोर देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.’ असे ही खाडे यांनी स्पष्ट केले.

यावर्षी जलोत्सव मोबाईल फोनवर सुद्धा पाहता येईल, त्यासाठी तीन दिवसांसाठी फक्त दहा रुपयांचे डिजीटल पासेस उपलब्ध होतील, असेही या वेळी सांगण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search