Next
कवींनी जपली सामाजिक बांधिलकी
खुल्या कवी संमेलनात ‘एक घास मायेचा, सामाजिक जाणिवेचा’ उपक्रम
मिलिंद जाधव
Monday, October 29, 2018 | 04:08 PM
15 0 0
Share this story

बोरीवली : मुंबईतील ध्यास कवितेचा काव्य मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या काव्य संमेलनात हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या काही कुटुंबांना दिवाळीत दोन घास सुखाचे खाता यावे या हेतूने ‘एक घास मायेचा, सामाजिक जाणिवेचा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमातून कवींनी ११५ किलो धान्यदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

ध्यास कवितेचा काव्य मंचातर्फे आयोजित हे खुले कवी संमेलन बोरिवलीतील सायली इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. साहित्यिका ज्योती कपिले, कार्यक्रमाचे अध्यक्ष संदेश भोईर, कार्याध्यक्ष श्रीकांत पवार, सचिव राजेंद्र चौधरी, प्रसिद्धी प्रमुख गुरुदत्त वाकदेकर, सदस्य संतोष मोहिते यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कवी संमेलनात ५५ कवींनी हजेरी लावली. या वेळी विविध विषयांवरील दर्जेदार स्वरचित कविता सादर करण्यात आल्या.

कपिले यांनी कवींना मार्गदर्शन केले. संमेलनात सहभागी झालेल्या कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या दिवाळीत काही गरीब कुटुंबे दोन घास तरी सुखाने खातील या हेतूने ‘एक घास मायेचा, सामाजिक जाणिवेचा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या काही कुटुंबांना दत्तक घेतलेल्या ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेला संमेलनात आलेल्या कवींनी तांदूळ, मूगडाळ, साखर अशा एकूण ११५ किलो धान्याचे दान करून उपक्रमाला सहकार्य केले.

शिल्पा परुळेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदेश भोईर यांनी ध्यास कवितेचा काव्य मंच साहित्याबरोबरच नेहमी सामाजिक बांधिलकीही जपत असल्याचे नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Niranjan b mude About 140 Days ago
verry nice
1
0

Select Language
Share Link