Next
‘व्यवसाय वाढीसाठी योग्य मार्केटिंग नेटवर्क आवश्यक’
ऐश्वर्या वाघमारे यांचे मत
BOI
Saturday, September 01 | 03:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘फॅशन व्यवसाय करणे हे आव्हानात्मक आहे. व्यवसायात सातत्य असेल तर हा व्यवसाय मोठा होण्यास नक्की मदत मिळते. आपले आप्तेष्ट, मित्रमंडळी फॅशन व्यवसायाचे मार्केटिंग करण्यास उत्तम मदत करतात. त्यासाठी नेटवर्क असणे आवश्यक असते’, असे मत फॅशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या, देआसराच्या सल्लागार ऐश्वर्या वाघमारे यांनी व्यक्त केले. 

‘देआसरा फाउंडेशन’तर्फे फॅशन व्यवसाय करणाऱ्यांसाठी व हा व्यवसाय नव्याने करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘स्टार्ट अँड ग्रो युअर फॅशन बिझनेस’ या विषयावर एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. 

या कार्यशाळेमध्ये त्यांनी फॅशन क्षेत्राशी निगडित अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले. फॅशन व्यवसाय हा कसा करावा, यात कोणकोणते प्रकार आहेत; तसेच हा व्यवसाय करण्यासाठी कोणत्या कौशल्याची आवश्यकता असते, भांडवल कुठून उपलब्ध करावे, मार्केटिंग, कॅश फ्लो मॅनेजमेंट आदी विषयांवर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होता. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link