Next
भिवंडीत आदिवासींना विविध योजनांतर्गत आर्थिक मदत
जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेचा पुढाकार
BOI
Monday, January 07, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this story



भिवंडी : नवीन वर्षाचे औचित्य साधून शहापूर येथील आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी प्रकल्प व जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भिनार जकात नाका येथे सहा जानेवारी २०१९ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदिवासी लाभार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भिवंडी पंचायत समिती सभापती रविना जाधव, माजी सभापती मोतीराम चोरघे, भाजप तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव, गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के, जिल्हा परिषद सदस्य दयानंद पाटील, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते रामनाथ पाटील, पंचायत समिती सदस्य रंजना उघडा, भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष यशवंत सोरे, उपाध्यक्ष बाळकृष्ण ठाकरे, लक्ष्मण गोष्टे, दशरथ पाटील, भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, माजी सरपंच विलास भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी उपस्थितांनी महादेव घाटाळ यांच्या सामाजिक कामाची स्तुती करून त्यांचे आभार मानले. जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा प्रकल्पस्तरीय आढावा समिती सदस्य महादेव घाटाळ यांच्या प्रयत्नातून भिवंडी तालुक्यातील आदिवासींना एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. यामध्ये चिंबीपाडा येथील एकविरा स्वयं सहायता बचत गटाला सॅनिटरी पॅड तयार करण्याची मशीन व कच्चा माल खरेदीसाठी चार लाख ४१ हजार रुपयांचे अनुदानित अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आले.

बहिस्थ शेळी पालनासाठी २० लाभार्थ्यांना प्रत्येकी ४० हजार रुपये, बुरुड कामासाठी ६० लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, मासेमारी जाळी खरेदीसाठी ७० लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये, कन्यादान योजनेअंतर्गत ४५ जोडप्यांना प्रति जोडपे १० हजार रुपये, तर ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत मोहंडूळ ग्रामपंचायतीस सिमेंट-काँक्रीट रस्त्यासाठी साथ लाख ५० हजार, भिनार सात लाख ५० हजार, ब्राम्हणगाव १५ लाख, पाये येथे रस्त्यासाठी पाच लाख, तर मंगल कार्यालय बांधण्यासाठी सात लाख ५० हजार, गाणे येथे सिमेंट-काँक्रीट रस्त्यासाठी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link