Next
दुर्गम भागातील शाळांसाठी डिजिटल क्लासरूम
नेक्स्ट एज्युकेशनचा उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, October 17 | 05:58 PM
15 0 0
Share this story

मुंबई : दुर्गम भागातील शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी डिजिटल क्लासरूम सुविधा देण्याचा अभिनव उपक्रम नेक्स्ट एज्युकेशनने कॅपजेमिनीच्या सहकार्याने हाती घेतला आहे. 

कॅपजेमिनीशी निगडीत  नऊ शहरातील सहा स्वयंसेवी  संस्थांना डिजिटल उपकरणे आणि पायाभूत सोयीसुविधा देऊन नेक्स्ट एज्युकेशनने ह्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. ‘टिचनेक्स्ट’ आणि ‘नेक्स्टबुक्स’ या सुविधांचा यात समावेश आहे.

 ‘टिचनेक्स्ट’ची रचना परस्परसंवादी पद्धतीने केली असून, ‘नेक्स्टबुक्स’मध्ये आकर्षक चित्र आणि मजकुराचा वापर केलेला आहे. राज्यातील शिक्षण मंडळाची सामग्री आणि स्थानिक भाषांतील व्हॉइसओव्हरची मदत घेऊन विद्यार्थी अधिक परिणामकारक पद्धतीने शिकतात.

नेक्स्ट एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक ब्यास देव रल्हन म्हणाले, ‘नेक्स्ट एज्युकेशनने, वंचित लोकांना तंत्रज्ञानातून शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डिजिटल वर्गांचा फायदा शहरी आणि दुर्गम भागांना व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. ‘टिचनेक्स्ट’  सुविधेची अंमलबजावणी देशातील २७ शाळांमध्ये करण्यात आली असून, त्याला अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नुकत्याच आम्ही केलेल्या सर्वेक्षणात बंगळूरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, पुणे, कोलकाता, सालेम, त्रिची आणि नॉयडा या नऊ शहरांमध्ये १०८ ‘टिचनेक्स्ट’ डिजिटल वर्गांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅपजेमिनीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवणे सहज शक्य होत आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link