Next
‘पीएसएपी’ तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीत विश्वविक्रमी उत्पादन
प्रेस रिलीज
Thursday, December 27, 2018 | 12:14 PM
15 0 0
Share this story

सांगली जिल्ह्यातील प्रशांत लटपटे यांच्या शेतातील ऊस.

पुणे : ‘ऊस शेतीमध्ये ‘पीएसएपी’ हे संशोधित तंत्रज्ञान पूरक द्रव्याच्या स्वरूपात दिल्यांनतर १६० टन एकरी विश्वविक्रमी उत्पादन आले असून, पाणीटंचाई, अवर्षणाच्या काळात आणि साखर उद्योगाच्या प्रतिकूल परिस्थितीत ‘पीएसएपी’ तंत्रज्ञान ऊस शेतीला तारेल,’ अशी माहिती ईशा अॅग्रो सायन्सेस या संशोधन संस्थेचे संस्थापक आणि कॅटॅलिस्ट सायन्स या शास्त्राचे संशोधक प्रशांत नांदर्गीकर यांनी दिली.

या संशोधनाची प्रत्यक्ष उपयुक्तता सिद्ध झाल्यावर ते माध्यमांसमोर प्रथमच जाहीर करण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संचालक डॉ. डी. जी. हापसे, ईशा अॅग्रो सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संदीप पाटील, सुक्रोटेक इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे नितीन देशपांडे, ईशा नंदर्गीकर उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील प्रशांत लटपटे यांनी त्यांच्या सावळजवाडी येथील ऊस शेतीत हे तंत्रज्ञान वापरून १६० टन एकरी ऊस उत्पादन घेऊन विश्वविक्रम केला आहे. हा विश्वविक्रम या वेळी जाहीर करण्यात आला.  

पत्रकार परिषदेत माहिती देताना मान्यवर

अधिक माहिती देताना नंदर्गीकर म्हणाले, ‘पीएसएपी म्हणजे ‘पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍक्टिव्ह फॉस्फरस’ हा मोलेक्युल होय. हे मोलेक्युल बिनविषारी, पर्यावरणस्नेही उत्पादन पावडर स्वरूपात वापरता येते. हे तंत्रज्ञान साखर उद्योगाला सध्याच्या अडचणीतून बाहेर काढू शकते. ‘पीएसएपी’ हे एकरी चार ते पाच किलो या प्रमाणात वापरता येते. चार ते पाच फवारण्यातून देता येते. हे पिकांवर येणाऱ्या जैविक, अजैविक ताणावर काम करते. आंतरिक रोग प्रतिकारकक्षमता वाढवते. त्यामुळे पीक सक्षम  होते आणि ऊसाची गुणवत्ता वाढते. याचे कोणत्याही पिकावर दुष्परिणाम होत नाहीत.’

१४ वर्षांपूर्वी ‘पीएसएपी’ तंत्रज्ञानाचे शास्त्रज्ञ प्रशांत नंदर्गीकर यांनी शास्त्रज्ञांच्या चमूबरोबर फॉस्फरसला कॅटॅलिटिक तंत्राने अॅक्टिव्हेट केले. नंतर त्याला स्प्लिट करून पोटॅश जोडला. चार वर्षांच्या अथक प्रयत्नाने या मोलेक्युलचा उदय झाला. ‘पीएसएपी’ तंत्रज्ञानाचा प्रथम वापर ‘प्रोफाइट’ नावाने नाशिकमध्ये द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी केला. आता हे तंत्र द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेकतकऱ्यांच्याही पसंतीस उतरले आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर सहा वर्षांपूर्वी ईशा अॅग्रो सायन्सेसच्या पुढाकाराने ऊसावर सुरू झाला. ऊस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षे चाचण्या घेतल्यावर सकारात्मक परिणाम दिसले. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, तसेच उत्तर प्रदेश येथील गन्ना अनुसंधान केंद्र येथे तीन वर्षे या तंत्रज्ञानाचा अभ्यास झाला. प्रती एकर पाच किलो ‘पीएसएपी’ वापरून सर्वसाधारण १० टन वाढीव ऊस उत्पादन आणि ०.३ टक्क्याने साखर उतारा वाढल्याचे नोंद झाले आहे.

प्रशांत लटपटे यांना राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडून या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्यांनी ७७ गुंठ्यांमध्ये या तंत्राचा वापर केला. आजमितीस त्यांना एकरी १६० टन ऊस उत्पादन मिळाले आहे. ऊस ५० दिवसांचा झाल्यावर प्रत्येकी सात दिवसांनी ‘पीएसएपी’ फवारणीची सुरुवात केली. अशा एकूण आठ फवारण्या केल्या. ‘पीएसएपी’चा एकूण वापर एकरी १० किलो केला. एकरी ऊसाची संख्या ३५ ते ४० हजार निघाली. पेऱ्यांची सरासरी संख्या ४८ ते ५५ नोंद झाली. ऊसाचे सरासरी वजन तीन किलोपासून सहा किलोपर्यंत नोंदले गेले.

अनेक मान्यवर ऊस तज्ज्ञांनी या विक्रमाची नोंद घेतली आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे, सांगली विभागाचे उप कृषी संचालक मकरंद कुलकर्णी, कृषी अधिकारी श्री. मेडीदार, श्री. चव्हाण, श्री. बडगुजर, राहुल माने यांनी भेट देऊन विश्वविक्रमी उत्पादनाची नोंद घेतली आणि प्रशंसा केली. लखनऊ येथील  ‘आयआयएसआर’चे डॉ. योगेश थोरात, डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. विकास खैरे, डॉ. श्रीहरी हसबनीस, डॉ. दिलीप काठमाळे, ‘डीएसटीए’ येथील ऊसतज्ज्ञ डॉ. सुभाष शिंदे, मच्छिंद्र भोकरे, बारामती अॅग्रोचे ऊस विकास अधिकारी प्रवीण भाट, ईशा अॅग्रो सायन्सेसचे संचालक संदीप पाटील, मयूर जयस्वाल, ऊस अधिकारी विजय नवनाळे यांच्या उपस्थितीत डॉ. ज्ञानेश्वर हापसे यांनी १६० टन विश्वविक्रमी ऊस उत्पादन निघाल्याचे जाहीर केले.

पाणीटंचाई, अवर्षणाच्या काळात साखर उद्योगाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ‘पीएसएपी’ तंत्रज्ञान, त्यातून दिलेला ‘अॅक्टिव्ह फॉस्फरस’ हा आपण दिलेली भेट ठरणार असल्याचे नंदर्गीकर यांनी या वेळी सांगितले.

संदीप पाटील म्हणाले, ‘पीएसएपी तंत्रज्ञानाचा वापर आम्ही साखर कारखान्याबरोबर संलग्न काम करून, त्याचा प्रसार कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांमध्ये करतो. गोदावरी  बायो रिफायनरी (समीरवाडी) या कारखान्यासोबत ईशा अॅग्रो सायन्सेस चे काम सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यात पाच हजार एकर आणि दुसऱ्या टप्प्यात २० हजार एकर क्षेत्रावर ‘पीएसएपी’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. या संलग्न प्रयत्नामुळे दोन वर्षे अवर्षणात अडकलेला हा कारखाना ‘पीएसएपी’ तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्व परिस्थितीत येऊ लागला आहे.’

संपर्क : ०९३७२६ १८६७७
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Swapnil chatke About 36 Days ago
Plz give me all information related to this product.....
0
0
Rajendra shegave About 81 Days ago
Please give me details my contact number 9448443397
0
0
Mohan About 82 Days ago
केवळ पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍक्टिव्ह फॉस्फरस’ एवढया एकाच घटकामुळे ऊसाचे वजन वाढते का ?
0
0
Sachin pandurang borade About 82 Days ago
Please give me details 7720899101
0
0
Yogesh Padwal About 82 Days ago
Plz give me details of the product and how it works in sugarcane farming Iam interested for this product
0
0

Select Language
Share Link