Next
राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती
BOI
Thursday, December 27, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this story

डॉ. सदानंद मोरेमुंबई : राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नुकतीच नव्याने निवड करण्यात आली असून, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

अध्यक्षांसहित अन्य ३५ नवीन सदस्यांची या वेळी निवड करण्यात आली असून यामध्ये गिरीश प्रभुणे, चित्रपट समीक्षक अशोक राणे, लेखक अरुण शेवते, भारत सासणे, डॉ. मरतड कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, कवी-संगीतकार संदीप खरे, आसाराम कसबे, ज्योतीराव कदम, उत्तम बंडू तुपे, रेणू पाचपोर, आशुतोष अडोणी, रवींद्र गोळे, सिसिलिया काव्‍‌र्हालो, उमा कुलकर्णी, सुप्रिया अय्यर, डॉ. विद्या पाटील, फरझाना डांगे, उषा परब, राणी दुर्वे, सुधीर पाठक, ए. के. शेख, विजय पाडळकर, जगन्नाथ शिंदे, अशोक सोनावणे, डॉ. रणधीर शिंदे, लखनसिंग कटारे, पत्रकार अरुण करमरकर, शंकर धडके, संजय ढोले, देविदास पोटे, रमेश पवार, डॉ. उत्तम रुद्रावतार, डॉ. मधुकर वाकोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

डॉ. सदानंद मोरे हे संतसाहित्य आणि समाजविषयक लिखाणाचे अभ्यासक असून आजवर त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन आणि संपादन केले आहे. प्रामुख्याने ते तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक असून सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील अनेक अध्यासनांशी ते निगडित आहेत. २०१५मध्ये पंजाबमधील घुमान येथे झालेल्या ८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link