Next
डॉ. धानके पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष
मिलिंद जाधव
Tuesday, October 02, 2018 | 02:56 PM
15 0 0
Share this storyभिवंडी :
 ठाणे जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप धानके यांची कल्याण येथे झालेल्या पशुवैद्यकांच्या भव्य सभेत पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यात आली. संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. सुनील काटकर व राज्य सरचिटणीस डॉ. मारोती कानोले यांनी त्यांच्या नावाची घोषणा करताच सर्वांनी एकमुखाने अनुमोदन दिले. 

डॉ. धानके हे शहापूर तालुक्यातील भूमिपुत्र असून, ते एक अभ्यासू पशुचिकित्सक व कर्मचारी नेते आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते राज्यभर सामाजिक आंदोलनात विविध संघटनांमध्ये कार्यरत आहेत. अनेक सामाजिक व कर्मचारी लढे त्यांनी लढले आहेत. तसेच ते एक उत्तम साहित्यिक असून, त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके व कॅसेट्स प्रकाशित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागात त्यांनी राज्यातील पहिले शेतकरी वाचनालय व बळीराजा वस्तू संग्रहालय किन्हवली येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात स्थापन केले आहे. 

ते ग्रामीण भागात शेतकरी शिबिरे आयोजित करून प्रशिक्षण देत असतात. अभ्यासू व आक्रमक नेतृत्व, सामाजिक चळवळीतील मुलुखमैदानी तोफ, शिवचरीत्र व भारतीय संविधानाचे व्याख्याते म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. तसेच सध्या ते जनक्रांती संघटना या सामाजिक चळवळीचे अध्यक्ष आहेत. असे बहुआयामी नेतृत्व पशुचिकित्सकांच्या संघटनेला मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. 

याच सभेत ठाणे जिल्हा कार्यकारिणीसुद्धा निवडण्यात आली आहे. यामध्ये डॉ. शेखर देशमुख (कार्याध्यक्ष), डॉ. प्रमोद गिरी (उपाध्यक्ष), डॉ. यशवंत आंधळे (उपाध्यक्ष), डॉ. भागवत दौंड (सचिव), डॉ. दीपक करण (कोषाध्यक्ष), डॉ. भगवान पाटील (सहसचिव), डॉ. गौरीकृपा निपुर्ते (महिला संघटक) यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. अतिष काशीद, डॉ. सोमेश्वर हल्लूर, तालुका सचिव म्हणून डॉ. अर्जुन मोहपे (मुरबाड), डॉ. अरुण जाधव (कल्याण), डॉ. मनोहर चन्ने (भिवंडी), डॉ. मुकुंद शिंदे (शहापूर), डॉ. विलास पाटील (अंबरनाथ), डॉ. नरेश भोईर (ठाणे) आदींची जिल्हा कार्यकारिणी म्हणून निवड करण्यात आली. 

नूतन जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप धानके यांनी पशुचिकित्सकांच्या सोबत राहून ‘न्यायाला माथा व अन्यायाला लाथा’ हेच संघटनेचे धोरण राहील, असे आपल्या भाषणात मांडले. ते म्हणाले, ‘वाडी-वस्तीवर शेतकरी, पशुपालक यांच्या पशुधनासाठी रात्रंदिवस सेवा देणारा पहिला पशुसेवक हा आमच्याच संवर्गाचा आहे. आमची संघटना शासनाला पूर्ण सहकार्य करील. परंतु आमच्यावर अन्याय झाला, तर संघटना ठाणे जिल्ह्यात आंदोलनाचे हत्यार उपसायलादेखील समर्थ आहे.’ 
डॉ. धानके यांच्या निवडीचे सामाजिक व राजकीय पातळीवर सर्वत्र अभिनंदन होत आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link