Next
‘फेडेक्स’ची ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी’शी भागीदारी
सामाजिक योगदानासाठी पुढाकार
प्रेस रिलीज
Tuesday, March 26, 2019 | 05:18 PM
15 0 0
Share this article:

पुणे : फेडेक्स कॉर्प.ची उपकंपनी आणि जगातील सर्वांत मोठी जलद वाहतूक (एक्स्प्रेस ट्रान्सपोर्टेशन) करणारी कंपनी असलेल्या फेडेक्स एक्स्प्रेसतर्फे स्थानिक वस्त्यांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या सेवाभावी संस्थेशी सहयोग केला आहे.

देशातील वंचित समाजघटकांसाठी त्यांची घरे व सरकारी शाळा रंगविण्यासारख्या सेवा प्रकल्पांमध्ये ‘फेडेक्स’च्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कलकत्ता या ठिकाणी १५०हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हा उपक्रम फेडेक्स केअर्स या जागतिक पातळीवरील सेवाभावी कार्यक्रमाचा भाग होता. या अंतर्गत जगभरातील फेडेक्स टीम सदस्य त्यांचा वेळ आणि कलागुण यांचा वापर करून स्थानिक समाजांना मदत करतात. जगभरात विविध संधी निर्माण करण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘फेडेक्स’तर्फे २०२०पर्यंत २०० समाजगटांमध्ये २०० दशलक्ष डॉलरचा निधी गुंतवला जाणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search