Next
गुहागरला होणार विभागीय साहित्य संमेलन
ज्ञानरश्मी वाचनालय आणि ‘मसाप’च्या गुहागर शाखेतर्फे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, December 12, 2018 | 12:46 PM
15 0 0
Share this story

गुहागर : येथील ज्ञानरश्मी वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची गुहागर शाखा यांच्या वतीने १४ ते १६ डिसेंबर २०१८ या कालावधीत विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाच्या सहवासात आणि अथांग समुद्राच्या साक्षीने गुहागर येथील पोलीस परेड मैदानावर तीन दिवस हे संमेलन रंगेल.

१४ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. सायंकाळी सहा वाजता व्यासपीठाचे उद्घाटन केल्यानंतर ७.३० वाजेपर्यंत स्थानिकांचे पूर्वसंध्या कविसंमेलन रंगणार आहे. याचे अध्यक्षस्थान चंद्रकांत राठोड भूषविणार असून, यात राजेंद्र आरेकर, संतोष गोणबरे सुधाकर कांबळे, ज्ञानेश्वर झगडे, वैशाली जाधव, प्रणित इंदुलकर, बाबासाहेब राशिनकर, विद्या जाधव, प्रदीप औंधकर, सागर यादव, विजया मेस्त्री, सोनिया घाडे हे सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन ईश्वर हलगरे करणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता गणेशवंदना, मंगळागौर, पालखीनृत्य, कोळीनृत्य, शेतकरीनृत्य, नमन हे कोकणी लोककला सादर करणारा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

१५ डिसेंबरला सकाळी नऊ ते ११.३० या वेळेत विभागीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आणि ‘रत्नाक्षर’ या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. या वेळी संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक व अभिनेते अभिराम भडकमकर, तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ११.३० वाजता ‘साहित्यिक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या कार्यक्रमात अजीम नवाज, सतीश काळसेकर, आप्पासाहेब खोत, तुकाराम धांडे, नीलिमा गुंडी, राजीव बर्वे  हे विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार आहेत. दुपारी १२.३० वाजता ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ हा पहिला परिसंवाद होणार असून, यात लेखक अरविंद जगताप, अभिनेते गिरीश कुलकर्णी सहभागी होणार आहेत. आदित्य जोशी हे याचे समन्वय आहेत.

त्यानंतर दुपारी २.३० वाजता कथाकथन होईल. याचे अध्यक्षस्थान आप्पासाहेब खोत (कोल्हापूर) भूषवतील. ज्योतिराम फडतरे (सोलापूर), रवींद्र कोकरे (फलटण), अनुप्रिता वैद्य (रत्नागिरी), श्रीराम दुर्गे (चिपळूण), मानली बावधनकर (गुहागर) हे कथाकथन करतील. सायंकाळी ४.३० वाजता अभिनेते मकरंद अनासपुरे हे अभिनेते सयाजी शिंदे यांची मुलाखत घेतील. सहा वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून, ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर याचे अध्यक्षस्थान भूषवतील. अजीम नवाज राही हे सूत्रसंचालन करतील. दुर्गेश सोनार, चंद्रकांत पोतदार, भरत दौंडकर कैलास गांधी, मनीषा पाटील, मोहन कुंभार, अंकुश आरेकर, राष्ट्रपाल सावंत, सुनील कदम, सूर्याजी भोसले, अनुजा जोशी, मारुती कटकधोंड, राधा भावे, वैशाली पाटील, भीमराव धुळूबुळू, वृषाली विनायक, विनोद कांबळी, ऋषिकेश देशमुख, संतोष काळे, दत्ता सरगर, गणेश भाकरे, संभाजी अडगळे, विलास सिंदगीकार, कविता मेहंदळे, कविता डवरी-लहुडकर हे यात सहभागी होतील. रात्री ९.३० वाजता ‘काव्य नव्हे अमृतसंचय’ हा गदिमा व बाबूजी यांच्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जाईल.

१६ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता ‘आमची बोली, आमची भाषा’ हा दुसरा परिसंवाद होईल. विनय बापट (चित्पावनी) यांच्या अध्यक्षस्थानी असून, यात जोसेफ तुस्कानो (सामवेदी), एल. बी. पाटील (आगरी), योगेश बांडागळे (संगमेश्वरी), निधी पटवर्धन (दालदी), रश्मी कशेळकर (मालवणी), कीर्ती गायकवाड (कातकरी) हे सहभागी होणार आहेत. यानंतर ११ वाजता प्रा. मिलिंद जोशी आणि आसावरी जोशी ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांची मुलाखत घेतील. दुपारी २.३० ते चार या वेळेत बंडा जोशी, अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर यांचे हास्य कवीसंमेलन होईल. सायंकाळी चार वाजता ‘कारगिल विजय’ या विषयावर अनुराधा गोरे यांचे व्याख्यान होईल.    

संमेलनाविषयी :
कालावधी : १४ ते १६ डिसेंबर २०१८
वेळ : सकाळी नऊ वाजता
स्थळ : पोलीस परेड मैदान, गुहागर
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna gramopadhye About 12 Days ago
How about. Regional Enterprises? Do. They exist?pp
0
0

Select Language
Share Link