Next
ट्रिनिटी कॉलेजच्या प्रा. पठाण यांना पीएचडी प्रदान
केजे शिक्षण संस्थेतर्फे विशेष सत्कार
प्रेस रिलीज
Monday, May 27, 2019 | 12:49 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजीनीअरिंग अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. पठाण खिजर अहमद नसीर खान यांना कर्षण बल (ड्रॅग फोर्स) या विषयासंबंधीत संशोधन कामाबद्दल पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. 

पीएचडीची पदवी मिळवणारे प्रा. पठाण ट्रिनिटी महाविद्यालयातील पहिले विद्यार्थी ठरले आहेत. पीएचडी करीत असताना प्रा. पठाण यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले; परंतु खंबीरपणे उभे राहत आपले ध्येय गाठले आणि कमीतकमी कालावधीत त्यांनी पीएचडी प्राप्त केली. 

भारतासह अमेरिका, इंग्लंड, इराण, इटली, टर्की, मलेशिया आदी देशांतील इंटरनॅशनल जर्नल आणि परिषदांमध्ये प्रा. पठाण यांनी एकूण १५ शोधप्रबंध सादर केले. प्रा. पठाण हे ट्रिनिटी महाविद्यालयातून पीएचडी प्राप्त करणारे पहिलेच विद्यार्थी आहेत. याच महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागात ते प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. गाड्यांची इंधन क्षमता वाढविण्यासाठी ड्रॅग फोर्स कमी करण्यासंदर्भात हे संशोधन असून, त्यासाठी प्रा. डॉ. प्रकाश डबीर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. 

प्रा. पठाणप्रा. पठाण यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्द्ल केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. या वेळी कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. भरत शिंदे, डॉ. एस. ए. काळे, डॉ. एम. एम. देशमुख, जी. ए. देशमुख यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘एरोडायनेमिक ड्रॅग (कर्षण बल) ही सर्व प्रोजेक्टाइल, रॉकेट्स, मिसाइल आणि प्रक्षेपण वाहनांशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. आधार दाब वाढवून बेस ड्रॅग कमी करणे आवश्यक आहे. सध्याची तपासणी बेस क्षेत्रामध्ये सक्रिय नियंत्रण यंत्रणा म्हणून चालणाऱ्या नियंत्रण जेट्सचा वापर करून बेस प्रेशरच्या नियंत्रणाशी संबंधित आहे. अंतराळ व संरक्षण उपकरणात कर्षण बल कमी होणे उपयुक्त ठरणार आहे,’ असे प्रा. पठाण यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search