Next
दिग्दर्शक महेश लिमये यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
प्रेस रिलीज
Wednesday, July 18, 2018 | 04:06 PM
15 0 0
Share this article:

‘टाईम्स अँड ट्रेंडस्‌’ अकादमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिग्दर्शक महेश लिमये
पुणे : दबंग, बालक-पालक, रेगे अशा चित्रपटांचे छायाचित्रकार, ‘यलो’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांनी ‘टाइम्स अँड ट्रेंडस्‌’ अकादमीला भेट देऊन,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

‘टाइम्स अँड ट्रेंडस्‌’ अकादमीने ‘फॅशन रिव्हर्स इनोव्हेशन’ हा विशेष अभ्यासक्रम विकसित केला असून, तो फॅशन आणि बॉलीवूड उद्योगातील तज्ज्ञांकडून तयार करण्यात आला आहे. यासाठी बॉलीवूड आणि फॅशन उद्योगातील तज्ज्ञ, दिग्दर्शक, छायाचित्रकार, वेशभूषाकार, सौंदर्यप्रसाधन तज्ज्ञ, कलाकार, फॅशन लेबल्सचे मालक, उद्योजक   व्याख्याने देतात. 

बॉलिवूडमध्ये आवश्यक असे सर्वांत महत्त्वाचे कौशल्ये कोणते या प्रश्नाला उत्तर देताना महेश लिमये म्हणाले, ‘मला वाटते यशस्वी होण्यासाठी निरीक्षण हे सर्वात महत्त्वाचे आवश्यक कौशल्ये आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती आणि लोकांचे आपण खूप बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘मी एक चांगला छायाचित्रकार होतो, परंतु मला सिनेमॅटोग्राफर बनायचे होते. मी स्पॉटबॉयचे काम करायला सुरुवात केली आणि सिनेमॅटोग्राफीची कला शिकलो. हळूहळू प्रगती करीत मी सहाय्यक बनलो आणि मग सिनेमॅटोग्राफर झालो. हे नक्कीच खूप सोपे आणि झटकन झाले नाही; पण मला ही अद्‌भुत कला आवडत होती म्हणून मी शिकत राहिलो.’  

चित्रपट क्षेत्रातील आपले विविध अनुभव, सलमान खान, अरबाज खान यासारख्या अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. 
  
या वेळी ‘टाइम्स अँड ट्रेंड्स’ अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अमित अग्रवाल म्हणाले, ‘सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ‘फॅशन रिव्हर्स इंजिनीअरिंग’ हा सर्वात सुयोग्य अभ्यासक्रम आहे. रोजगार मिळविण्यासाठी उपयोगी ठरतील अशी कौशल्ये मिळविणे आणि संबंधित घटक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम बनविण्यात आला आहे. हा दहा आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे.’   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search