Next
महिला बचत गटांसाठी ‘घरोबार’चे व्यासपीठ
‘फिक्की फ्लो’चा उपक्रम
BOI
Friday, September 13, 2019 | 12:30 PM
15 0 0
Share this article:

‘घरोबार’ दालनातील महिला बचतगट उत्पादन  प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘फिक्की फ्लो’च्या अध्यक्षा रितू छाब्रिया,उपाध्यक्षा उषा पूनावाला, अनिता सणस, ‘घरोबार’च्या संचालिका रश्मी माहेश्वरी, अवनी श्रॉफ, वैशाली राणे, धनश्री लाड आदी

पुणे : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, बचत गटांतील महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’ संस्थेच्या वतीने ‘घरोबार डॉट कॉम’चे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. एनआयबीएम-कोंढवा रस्त्यावरील दी रॉयल हेरिटेज मॉलमध्ये असलेल्या ‘घरोबार’च्या दालनामध्ये ग्रामीण भागातील उद्योजिका, बचत गट, विशेष मुले यांनी तयार केलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्यात आले असून, येथे कापडी पर्स, पाउच, आकर्षक कापडी फाइल्स, कुशन कव्हर्स, भेटकार्डे, सौंदर्यप्रसाधने, दागिने यांसह ग्रामीण, तसेच पारंपरिक शैलीचे दर्शन घडविणाऱ्या वस्तू उपलब्ध आहेत.

‘फिक्की फ्लो’च्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने स्वयम या कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच झाले. ‘फिक्की फ्लो’च्या उपाध्यक्षा उषा पूनावाला, सदस्या अनिता सणस, ‘घरोबार’च्या संचालिका रश्मी माहेश्वरी, अवनी श्रॉफ, बचत गटांच्या समन्वयिका वैशाली राणे, उद्योजिका धनश्री लाड या वेळी उपस्थित होत्या. 


‘येत्या काळात डी-मार्ट, तसेच रिलायन्ससोबतही अशी भागीदारी करून महिलांच्या सक्षमीकरणाचे काम केले जाणार आहे. निरनिराळ्या बचतगटांबरोबर व विशेष विद्यार्थ्यांसोबत काम करणाऱ्या वैशाली राणे आणि ग्रामीण भागातील महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या धनश्री लाड यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल,’ असे अनिता सणस यांनी सांगितले. 

‘वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, विशेष विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्था अशा विविध संस्थासोबत संपर्क साधत त्यांनी तयार केलेल्या वस्तू शहरातील नागरिकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात असून, उत्पादकांसाठी कार्यशाळा आयोजित करून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात येते,’ असे उषा पूनावाला यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search