Next
‘एसएस’चा प्रथम वर्धापनदिन उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, July 30, 2018 | 03:52 PM
15 0 0
Share this story

एस. एस. कम्युनिकेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त केक कापताना ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कदम (डावीकडे), ‘एसएस’चे अमोल डोंगरे (मध्ये), वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते. शेजारी ‘एसएस’चे येथील व्यवस्थापक सुशांत वडगावे आणि कर्मचारी.

रत्नागिरी : एस. एस. कम्युनिकेशनच्या येथील दुसऱ्या शाखेचा प्रथम वर्धापनदिन आज (३० जुलै) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कदम उपस्थित होते.  

एस. एस. कम्युनिकेशन ही मोबाइल वितरण क्षेत्रातील प्रसिद्ध आणि मोठी साखळी असून, याच्या शाखा महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात सुरू करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि रत्नागिरी येथे ‘एसएस’च्या दोन शाखा सुरू करण्यात आल्या. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील नवकार प्लाझामध्ये गतवर्षी ‘एसएस’ची दुसरी शाखा सुरू करण्यात आली. आधुनिक सुविधांनीयुक्त दालन, ग्राहकाभिमुख दर्जेदार सेवा, आकर्षक ऑफर्स आणि सवलत, विक्रीपश्चात तत्पर सेवा आणि सहकार्य करणारा कर्मचारी वर्ग यांमुळे अल्पावधीतच ‘एसएस’ रत्नागिरीकरांच्या पसंतीस उतरले आहे.

पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांचे स्वागत करताना सुशांत वडगावे (डावीकडे) आणि अमोल डोंगरे.आज नवकार प्लाझा येथील शाखेचा प्रथम वर्धापन दिन असून, यानिमित्त सकाळी रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विभूते आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक कदम यांच्या हस्ते केक कापण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रोटरी क्लबमार्फत गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने ‘एसएस’मध्ये ठेवण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये जमलेली सर्व रक्कम आशादीप या मतिमंदांसाठी निवासी स्वयंरोजगार केंद्राला मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
 
दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त दिवसभर स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक आणि ग्राहकांनी उपस्थित राहून ‘एसएस’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘एसएस’च्या वतीने येथील शाखा व्यवस्थापक सुशांत वडगावे, अमोल डोंगरे यांनी सर्वांचे स्वागत केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link