Next
जनसेवा ग्रंथालयातर्फे ‘पाऊस’ विषयावर काव्य स्पर्धा
BOI
Monday, July 15, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : कविवर्य कृ. ब. निकुंब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जनसेवा ग्रंथालयातर्फे ‘पाऊस’ या विषयावरील जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील नवोदित कवींकडून पावसाच्या बहारदार कविता मागविण्यात आल्या आहेत.

वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी नेहमीच कटीबद्ध असलेल्या जनसेवा ग्रंथालयातर्फे या वर्षीच्या काव्य स्पर्धेसाठी ‘पाऊस’ हा विषय देण्यात आला आहे. भावकवी आणि मृगावर्त या नावीन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कविवर्य कृ. ब. निकुंब सर्वांना परिचित आहेत. यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवोदित कवींनी स्वत:च्या, अप्रकाशित ‘पाऊस’ या विषयावरील किमान दोन कविता १५ ऑगस्टपूर्वी जनसेवा ग्रंथालयाकडे पाठविणे आवश्यक आहे.  स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे; तसेच स्पर्धेतील विजेत्यांसह निवडक उत्कृष्ट कवींना काव्यसंमेलनात आमंत्रित करून स्वत:च्या कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.  या स्पर्धेत सहभागी झालेल्या कवींना रत्नागिरीतील नामवंत कवींच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. 

कवितेसोबत कवींनी स्वतंत्र कागदावर आपले पूर्ण नाव, पत्ता, व्हॉटस्अॅप क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नवोदित कवींनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जनसेवा ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.

कविता पाठविण्यासाठी पत्ता : जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मीचौक-रत्नागिरी. ४१५ ६१२ 
व्हॉटस्अॅप क्रमांक : ९०११२ १२९८४ 
ई-मेल : amolpalye@gmail.com 

(कृ. ब. निकुंब यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ या निकुंब यांच्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search