Next
कॉईनेक्समध्ये पँटेरा कॅपिटल आणि बीनेस्क्टची गुंतवणूक
प्रेस रिलीज
Friday, December 15, 2017 | 12:12 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आपले आपले आगळेवेगळे बिझनेस मॉडेल भक्कम करण्यासाठी तसेच भारतातील ब्लॉकचेन क्षेत्राच्या चौकटी मोडून टाकण्याची योजना सफल करण्यासाठी, ‘कॉइनेक्स’ या  भारतातील पहिल्या मल्टि-क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज आणि ट्रेडिंग व्यासपीठाला ‘पॅण्टेरा कॅपिटल’ तसेच ‘बीनेस्क्टपीटीई लिमिटेड’ यांसारख्या जागतिक स्तरावरील गुंतवणूक कंपन्यांकडून निधी प्राप्त झाला आहे. निधीच्या मालिकापूर्व पहिल्या फेरीत प्रामुख्याने गुंतवणूक केली ती बीनेक्स्टपीटीई लिमिटेडचे व्यवस्थापकीय भागीदार डर्क व्हॅन क्वावबेक व पँटेरा कॅपिटलचे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल मोरहेड यांनी. या गुंतवणुकीतून मिळालेला निधी प्रामुख्याने तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी, उत्पादन दर्जा उंचावण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी वापरला जाणार आहे.

ऑगस्ट २०१७मध्ये सुरू झालेले कॉइनेक्स बिटकॉइन, एथिरिअम, रिपल, बिटकॉइन कॅश आणि लाइटकॉइन या सर्व क्रिप्टोकरन्सीचे रिअल-टाइम (वास्तविक) ट्रेडिंग पीअर-टू-पीअर एक्स्चेंजवर आधारित एका वेब प्लॅटफॉर्मवर सुलभतेने करून देत आहे. थेट, ओपन ऑर्डर बुकद्वारे होणाऱ्या आदानप्रदानामुळे सूचीतील प्रत्येक डिजिटल अॅसेटच्या किमतीत पारदर्शकता राखली जाते. यामुळे संभाव्य खरेदीदार त्याची बोली लावू शकतो आणि विक्रेता त्याला ज्या क्रिप्टोकरन्सीत व्यवहार करायचा आहे ती मागू शकतो. कॉइनेक्सचा यूएसपी त्यांचे दर्जेदार व स्वत:च्या मालकीचे ट्रेडिंग इंजिन आहे.

कॉइनेक्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल राज म्हणाले, ‘एका उदयोन्मुख प्रवाहातून या क्रिप्टोकरन्सीजचे स्थित्यंतर पूर्णपणे विकसित झालेल्या तंत्रज्ञानात्मक व आर्थिक संकल्पनेत झाले आहे. त्यामुळे आता आमचे उद्दिष्ट ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी होण्याचे तसेच, भारतातील व जागतिक स्तरावरील क्रिप्टोकरन्सीजसाठी एक ‘गो-टू’ प्लॅटफॉर्म होण्याचे आहे. पँटेरा कॅपिटल आणि ‘बीनेक्स्ट’सारख्या प्रतिष्ठित कंपन्यांकडून निधी आणि मार्गदर्शन मिळाल्यामुळे आता आमचे सुरक्षित व जुळवून घेणारे तंत्रज्ञान आणखी भक्कम करण्यास, गुंतवणूकदारांना काम करण्यासाठी आधुनिक वित्तीय परिसंस्था (इको-सिस्टीम) उभारण्यास उत्सुक आहोत. तसेच डिजिटल असेट्सची खरेदी, साठवण आणि व्यापार अधिकाधिक सुलभ करण्यावर आमचा भर राहील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search