Next
‘गुमो’चा ‘जॉइन द सिस्टरहूड’ उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, March 07, 2018 | 11:41 AM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील अग्रणी ओम्नी-चॅनल ट्रॅव्हल टेक कंपनी ‘गुमो’ने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने ‘जॉइन द सिस्टरहूड’ ही नवी मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भारतातील महिलांमध्ये उद्योजकत्वाची प्रेरणा बळकट करण्याचे तसेच भारताच्या आजही फारशा माहितीच्या नसलेल्या वैभवसमृद्ध जगाची सफर करण्याची संधी पर्यटकांना देत पर्यावरण-स्नेही पर्यटनचा (इको-टूरीझम) पुरस्कार करणे अशी दोन ध्येये ‘गोमो’कडून सामाजिक हेतूने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामागे आहेत.

‘जॉइन द सिस्टरहूड’ मोहिमेअंतर्गत ‘गुमो’ने पाँडेचेरी आणि जोधपूर अशा दोन ठिकाणी दोन अनोख्या भटकंती योजनांची आखणी केली आहे आणि यापैकी प्रत्येक सहलीमध्ये पर्यटकांना गुंतवून ठेवणारे अनेक उपक्रम सामील आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे आणि त्यांच्यासाठी रोजगार तसेच सूक्ष्म-उद्योग उभारणीच्या संधी तयार करण्यासाठी प्रयत्न करणारे मेसन अँड कंपनी या चॉकलेट लेबलसारख्या अनेक प्रमुख उद्योगसंस्थांशी, पाँडेचरी येथील शांती जॉय निवास तसेच जोधपूरमधील रावलाभेन्सवारा ग्रुप यांशी हातमिळवणी केली आहे. या मोहिमेतून आपल्या ग्राहकांसाठी अनवट पर्यटनस्थळांना भेट देण्याचा उच्च दर्जाचा, सर्वस्वी वेगळा आणि समृद्ध असा प्रवासानुभव घडवित आहे.

‘गुमो’च्या सीबीओ सोनिया मेहता म्हणाल्या, ‘प्रवास म्हणजे आणि रोजच्या जगण्याचा शीण घालविण्याचा आणि मन मोकळे करण्याचा एक मार्ग आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्कृतींचा, स्थानिक समाजांचा आणि लोकांचा शोध घेण्याचीही ती एक गुंतवून ठेवणारी पद्धत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही सुरू केलेल्या ‘जॉइन द सिस्टरहूड’ उपक्रमातून आम्हाला हीच गोष्ट अधोरेखित करायची होती. या असाधारण प्रवास मोहिमेमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना भारतीय भूखंडाच्या फारशा ओळखीच्या नसलेल्या भागांची सफर घडवून आणणार आहोत हे तर खरेच; पण त्याचबरोबर पर्यावरण स्नेही पर्यटनाला आणि स्थानिक उद्योगांना मदतीचा खंबीर हात देत असलेल्या सूक्ष्म-उद्योजकतेला प्रोत्साहनही देणार आहोत. ग्रामीण भारतातील स्थानिक समाज आणि त्यांचे नेतृत्व करत असलेल्या महिला उद्योजक यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडला आहे.’

या खास आखण्यात आलेल्या सहलींचा भाग म्हणून पर्यटकांना पाँडेचेरी आणि जोधपूर या दोन्ही ठिकाणी स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या सहलींमध्ये स्थानिक कॅफेज, शेते, कारागिरांच्या कार्यशाळा आणि हस्तकला केंद्रे यांची भेटही घेता येणार असल्याने देशाच्या फारशा धुंडाळल्या न गेलेल्या भागांत विविध लोकांचे जनजीवन कसे आहे, याची एक झलक त्यामुळे पर्यटकांना मिळणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link