Next
आगाशे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी केले चांगल्या गोष्टींचे संकल्प
BOI
Saturday, July 13, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी :
रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी संकल्प दिनी (१३ जुलै) रोजी विविध प्रकारचे संकल्प केले आणि ते वर्षभर पाळण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमाला आचार्य म्हणून अजित जोग उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संकल्पाचे महत्त्व सांगितले. 



‘मन आणि बुद्धी एकत्र आल्याशिवाय यश मिळत नाही. ज्ञान व माहिती यात भरपूर फरक आहे. धी, धृती, स्मृती या तीन प्रकारच्या बुद्धी असतात. समजून घेण्याची शक्ती, धारणा शक्ती व सर्व विषय सामावलेली शक्ती असे त्याचे वर्णन करता येईल. एकेका पायरीवरून आपल्याला पुढे जायचे आहे. त्यासाठी शिकले पाहिजे, चांगले संकल्प केले पाहिजेत आणि त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. शिस्त, व्यायाम, चांगले खाणे, बोलणे, ध्यानधारणा आदी गोष्टी केल्या पाहिजेत,’ असे जोग म्हणाले.



जोग यांनी विद्यार्थ्यांना ‘शिवाजी म्हणतो’ या खेळाद्वारे व हसत खेळत विविध प्रश्न विचारत त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मोठेपणी कोण व्हायला आवडेल, आपली ज्ञानेंद्रिये कोणती आदी विविध प्रश्नव विचारून त्यांना बोलते केले. 

मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी प्रास्ताविक केले व जोग यांचा परिचय करून दिला. या वेळी शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर, चंद्रशेखर करंदीकर आणि निर्मलाताई रामचंद्र जोग उपस्थित होत्या. 



त्यानंतर विद्यार्थ्यांनी संकल्पगीत म्हटले. या कार्यक्रमानंतर जोग यांनी पालकांशी ‘संकल्प’ या विषयावर संवाद साधला. शिक्षिका सागवेकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. 



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. हातखंबकर यांनी जोग यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search