Next
‘आयसीआयसीआय’ने दाखल केले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड
‘अॅमेझॉन पे’बरोबर भागीदारी
प्रेस रिलीज
Wednesday, October 31, 2018 | 01:14 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने अॅमेझॉन या जागतिक ई-कॉमर्स कंपनीच्या ‘अॅमेझॉन पे’ या ऑनलाइन पेमेंट सुविधेबरोबर भागीदारी करून को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड दाखल केले आहे. ‘अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड’ असे नाव असलेले हे कार्ड डिजिटल सॅव्ही ग्राहकांना सर्वोत्तम रिवॉर्ड पॉइंट मिळवून देईल.

अॅमेझॉन प्राइम मेंबरना अॅमेझॉन डॉट इनवरील खरेदीवर पाच टक्के रिवॉर्ड पॉइंट मिळवण्याची संधी देणारे देशातील हे पहिले कार्ड आहे. अन्य ग्राहकांना तीन टक्के रिवॉर्ड पॉइंट मिळवता येतील; तसेच त्यांना फूड डिलिव्हरी, युटिलिटी पेमेंट्स, सिनेमाची तिकिटे अशा विविध श्रेणींतील अॅमेझॉन पे पार्टनर मर्चंटकडे केलेल्या खरेदीवरही दोन टक्के रिवॉर्ड पॉइंट मिळवता येतील. हे नवे कार्ड केवळ व्हिसावर उपलब्ध असल्याने, ग्राहकांना देशभर जेथे जेथे व्हिसा कार्ड स्वीकारले जाते, तेथील लाखो मर्चंटकडेही रिवॉर्ड मिळवता येणार आहेत.

‘अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड’चे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक रिवॉर्ड पॉइंट हा एका रुपयाइतक्या मूल्याचा असेल व ग्राहकांना वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या १६० दशलक्षहून अधिक उत्पादनांमधून खरेदी करताना किंवा अॅमेझॉन पे स्वीकारणाऱ्या मर्चंटना पैसे देत असताना हे पॉइंट अॅमेझॉन डॉट इनवर रिडीम करता येऊ शकतात. या रिवॉर्ड पॉइंटमध्ये या क्षेत्रातील काही फायदेही समाविष्ट आहेत. या श्रेणीतील सर्वोत्तम रिवॉर्ड असण्याबरोबरच ग्राहकांना इंधनावरील चार्जमध्ये सवलत मिळेल, नो-कॉस्ट ईएमआय सवलती मिळतील व अॅमेझॉन डॉट इन व अॅमेझॉन पे पार्टनर मर्चंटकडील सेलच्या दरम्यान सरप्राइज बोनस पॉइंट्स मिळतील.

नव्या उत्पादनाविषयी बोलताना आयसीआयसीआय बँकेच्या अनसिक्युअर्ड सेट्स व कार्ड्सचे जनरल मॅनेजर सुदिप्ता रॉय म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेने देशात कन्झ्युमर लोन्स व कार्डांचा वापर लोकप्रिय केला. आम्हाला आता दोन विशिष्ट कन्झ्युमर ट्रेंड दिसून येत आहेत. एक म्हणजे, लाखो भारतीय आता बरीचशी खरेदी ऑनलाइन करू लागले आहेत. दुसरे म्हणजे, ग्राहकांना सोयीस्कर रिडम्शन देणाऱ्या उत्तम रिवॉर्ड्सची अपेक्षा आहे. ग्राहकांच्या या अपेक्षा पूर्ण करतील, असे नवे व आकर्षक क्रेडिट कार्ड दाखल करण्यासाठी ‘अॅमेझॉन पे’बरोबर भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.’

‘अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड हे ग्राहकांना सर्वोत्कृष्ट रिवॉर्ड देणारे कार्ड आहे, असे आम्हाला वाटते. प्रत्येक रिवॉर्ड पॉइंट हा खर्च केलेल्या एका रुपयाइतका असून, हे पॉइंट्स अॅमेझॉन डॉट इनवरील लाखो उत्पादनांसाठी रिडीम करता येऊ शकतात. हे आकर्षक व या श्रेणीतील सर्वोत्तम कार्ड बँकेच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओच्या वाढीसाठी मोठे योगदान देईल, याची खात्री आहे,’ असा विश्वास रॉय यांनी व्यक्त केला.

यानिमित्त बोलताना ‘अॅमेझॉन पे’च्या इमर्जिग पेमेंट्सचे संचालक विकास बन्सल म्हणाले, ‘अॅमेझॉन पे ग्राहकांसाठी ऑनलाइन खरेदी अधिक परवडणारी ठरावी व उत्तम मूल्य देणारी असावी, असा आमचे हेतू आहे. ‘अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड’ आमच्या ग्राहकांना अॅमेझॉनवर व अन्यत्र केलेल्या खरेदीवर आकर्षक रिवॉर्ड देणार आहे. हे कार्ड अतिशय विश्वासार्ह, सोयीस्कर व फायदेशीर असल्याने ग्राहक आम्हाला नक्कीच पसंती देतील. या सणासुदीच्या काळात, आमच्याबरोबर खरेदी करत असताना, ग्राहकांना आणखी बचत करण्याची संधी मिळू शकते.’

‘या को-ब्रँडेड कार्डासाठी अॅमेझॉन पे व आयसीआयसीआय बँक यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे कार्ड ग्राहकांना भारतात डिजिटल पेमेंट क्षेत्रात अपूर्व अनुभव देईल, याची खात्री आहे. ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या भारतीयांची संख्या पूर्वीपेक्षा वाढली असल्याने, या नव्या कार्डामुळे ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरीकडून जलद, सुरक्षित व सोयीस्कर डिजिटल पेमेंटच्या विश्वात प्रवेश करण्यास मदत होईल,’ असे व्हिसाचे भारत व दक्षिण आशियाचे मर्चंट सेल्स अँड अॅक्वायरिंगचे उपाध्यक्ष शैलेश पॉल यांनी सांगितले.

प्रारंभी अॅमेझॉन डॉट इन अॅप वापरणाऱ्या लाखो आयसीआयसीआय बँक ग्राहकांना इन्व्हिटेशननुसार कार्ड दिले जाणार आहे. निवडक ग्राहकांना त्यांच्या अॅमेझॉन अॅपवर इन्व्हाइट पाहता येऊ शकते. त्यानंतर त्यांना रेडी-टू-युज डिजिटल कार्ड लगेच मिळण्यासाठी ताबडतोब अर्ज करता येईल व ही प्रक्रिया पूर्णतः डिजिटल व पेपरलेस पद्धतीने होईल. डिजिटल कार्डाचा वापर करून ग्राहकांना लगेचच ऑनलाइन खरेदी सुरू करता येईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search