Next
वाहतुकीच्या खेळखंडोबातून मार्ग काढणारा बाप्पा..
पुण्याच्या रत्नाकर जोशींनी साकारला वाहतुकीचा देखावा
BOI
Thursday, September 20 | 02:46 PM
15 0 0
Share this story


गणेशोत्सवात अनेकजण नागरिकांचे मंनोरंजन करत असतानाच आपल्या देखाव्यातून काही सामाजिक संदेश देता येईल का, याचाही पूरेपूर विचार करून त्या पद्धतीची आरास करत असतात. पुण्यातील पर्वती परिसरात राहणारे रत्नाकर जोशी यांनी आपल्या घरात पुणे शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा यावर आधारित प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे.

रत्नाकर जोशी हे जुन्या मोटार गाड्यांचे संग्राहक आहेत. ते पुणे आर. टी. ओ.मधून निवृत्त झालेले कर्मचारी आहेत. १९८६पासून आजतागायत जुन्या ते नवीन मोटारींपर्यंतचे जवळपास सर्व मोटार मॉडेल जोशी यांच्या संग्रहात पाहायला मिळतात. याच मोटारींचा वापर करत त्यांनी शहरातील वाहतुकीवर आधारीत देखावा तयार केला आहे. यामध्ये शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतुक व त्यामुळे होणारी कोंडी दाखवण्यात आली आहे. 

रत्नाकर जोशीजोशी यांच्या संग्रहालयात १९२३मधील फोर्ड बनावटीचा ट्रक, हमर, फेरारी, जग्वार इत्यादी परदेशी बनावटीच्या गाड्यांच्या प्रतिकृतींसह मारुती कार, महिंद्रा, डुकाटी इत्यादी दुचाकींच्या प्रतिकृतीही पाहायला मिळतात. 

(देखाव्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link