Next
मायक्रोवेव्ह कुकिंग
BOI
Monday, November 27 | 11:25 AM
15 0 0
Share this story

फ्रीज, टीव्हीसारखाच मायक्रोवेव्ह हा आपल्या घराचा अविभाज्य भाग बनला आहे. तरीही मायक्रोवेव्हचा उपयोग पदार्थ गरम करण्याव्यतिरिक्त फारसा केला जात नाही. मायक्रोवेव्हमध्ये कितीतरी पदार्थ बनवता येतात, हे अंजली राजेंद्र पुराणिक यांच्या या पुस्तकातून समजते.

पुस्तकात प्रारंभी त्यांनी या उपकरणाची माहिती दिली आहे. मायक्रोवेव्हमध्ये करता येतील अशा काही सोप्या पाककृती दिल्या आहेत.

चटण्या, सॅलड्स, स्नॅक्स, भाज्यांचे प्रकार, सूप, सार, कढी असे नाना प्रकारचे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये बनवता येतात. गोड पदार्थ, नॉनव्हेज पदार्थ तर करता येतातच, शिवाय उपवासाचे पदार्थही जमतात. भातांचे विविध प्रकारही करता येतात. पुराणिक यांनी पुस्तकात खास कन्व्हेक्शन मॉडेलच्या काही पाककृतीही दिल्या आहेत.
 
प्रकाशक : अंजली पुराणिक
पाने : १२०
किंमत : १५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link