Next
‘स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या’
BOI
Friday, March 09, 2018 | 12:24 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : ‘मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन वापरा. या दरम्यान स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या’, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने अस्मिता योजना कार्यशाळा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी ‘मासिक पाळीदरम्यान आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी’ या घडीपत्रिकेचे व अस्मिता सॅनिटरी नॅपकिन वाटप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रकल्प संचालक अनिलकुमार नव्हाळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, वरिष्ठ लेखाधिकारी रूपाली कोळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक त्रिवेणी भोंदे, ‘अस्मिता’चे जिल्हा व्यवस्थापक अमोल शिरसट उपस्थित होते.

अस्मिता सॅनिटरी नॅपकिन वाटप करताना उपाध्यक्ष शिवानंद पाटील. शेजारी अनिलकुमार नव्हाळे, चंचल पाटील, सचिन जाधव, त्रिवेणी भोंदे आदी.सभापती देशमुख म्हणाल्या, ‘मासिक पाळीच्या काळात हलका व्यायाम करावा. या काळात विश्रांतीची आवश्यकता आहे. जेवणामध्ये मीठाचा वापर कमी करावा; तसेच हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण अधिक असावे.’

या वेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव म्हणाले, ‘महिलांनी मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा. मासिक पाळीबाबतीत गैरसमज दूर होणे आवश्यक असून, महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे. हा विषय महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेशी निगडीत आहे.’

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील किमान १० हजार महिलांना हा विषय समजावून सांगण्यात येत आहे. यासाठी आशांची मदत घेण्यात येत आहे.

या प्रसंगी ‘अस्मिता अॅप’ची माहिती देण्यात आली. या वेळी विस्तार अधिकारी देशमुख, यशवंती धत्तुरे, शंकर बंडगर, अर्चना कणकी, महादेव शिंदे उपस्थित  होते. जिल्हा व्यवस्थापक सायली माने, व्यंकट जाधव, प्रशांत सातपुते यांनी परिश्रम घेतले. शैला केशवदास यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दत्तात्रय भोसले About
छान बातमी आहे . या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे .
0
0

Select Language
Share Link
 
Search