Next
‘स्पर्धा परीक्षेच्या यशात सकारात्मकता महत्त्वाची’
प्रेस रिलीज
Wednesday, August 08, 2018 | 03:38 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘गरीब परिस्थिती यशात अडथळा ठरत नाही, तर दरिद्री मानसिकता आपल्या अपयशामागे असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन अंगी बनवला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेच्या यशात सकारात्मकता आणि कठोर परिश्रम महत्त्वाचे असतात,’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आदिवासी समाजातील पहिले प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.

आकार फाउंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षेत (केंद्र व राज्य लोकसेवा आयोग) यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार त्यांच्या डॉ. भारूड यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘यशदा’चे माजी संचालक रवींद्र चव्हाण, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वाढई, सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश लाड, आकार फाउंडेशनचे संस्थापक प्रा. राम वाघ, पुणे आकारचे व्यवस्थापक प्रा. प्रवीण मुंढे, संयोजक सारिका मुंढे, ज्ञानेश्वर जाधवर आदी उपस्थित होते.

डॉ. भारूड म्हणाले, ‘यशाप्रमाणे अपयश पचवण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. स्पर्धा परीक्षेत पद मिळवल्यानंतर हुरळून जाता कामा नये. पद मिळाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते. कारण डाग न लागता समाजाची सेवा करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण असतो. शुद्ध हेतूने काम केल्यास ते आपोआप होते. इच्छाशक्ती, बौद्धिक क्षमता, कठोर परिश्रम, अपयश पचवण्याची शक्ती आपल्या यशात गरजेच्या असतात.’‘वडील जन्माआधीच गेल्याने बालपण कठीण अवस्थेत गेले; पण सतत परिस्थिती बदलण्याचा विचार मनात होता. आई-मावशी आणि शिक्षक यांनी घडवले. निष्ठा, शिस्त, नम्रता आणि कामाची तळमळ आपल्याकडे असावी. आई-वडील आणि शिक्षक यांचा आशिर्वाद हाच आपल्यासाठी मोठा असतो. आपल्या कामातून आनंद मिळावा आणि पालकांना अभिमान वाटावा असे कार्य आपल्या हातून घडावे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे,’ असे डॉ. भारूड यांनी नमूद केले.

या समारंभात डॉ भारूड यांच्या हस्ते आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान २०१९चे उद्घाटन करण्यात आले. या अभियानाच्या प्रवेश परीक्षेद्वारे निवड झालेल्या ३०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एक वर्षाचे मोफत व सवलतीत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. पुढील वर्षासाठी पुणे व औरंगाबाद विभागाची दोन हजार केली जाईल,’ अशी माहिती प्रा. वाघ यांनी दिली.

डॉ. वाढई, लाड, रवींद्र चव्हाण यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. वाघ यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर जाधवर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मुंढे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search