Next
ऑफिशिअल सिक्रेट्स
BOI
Tuesday, February 05, 2019 | 10:06 AM
15 0 0
Share this story

आयटी, कम्प्युटर इंजिनीअर झाले, की साहजिक मोठ्या कंपन्या अथवा आयटी कंपन्यांमध्ये काम करण्याचे आकर्षण असते. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुण पिढीच्या भावविश्वावर प्रतीक पाटील यांनी ‘ऑफिशिअल सिक्रेट्स’ या कादंबरीतून प्रकाश टाकला आहे. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर सुजय शिंदेला लगेचच नोकरी मिळते. जय ठाकूरच्या टीममध्ये काम सुरू केल्यानंतर तो हळूहळू कंपनीत रुळतो. मित्रांमधील गॉसिपिंग, ऑफिसमधील प्रेमप्रकरणे यांवर चर्चा, पार्टी, कामामधील स्पर्धा असे जयचे आयुष्य सुरू होते. यात मधूनच तो कॉलेज जीवनातील आठवणींत रमून जात असतो. विशेषतः मनीषाची आठवण मनात कायम असते. ऑफिसमधील अश्विनी पवार ही मुलगी सुजयला अचानक एसटीत भेटते. पुढे दोघेही मैत्री वाढवत नेतात. याचे रूपांतर प्रेमात होऊन दोघे लग्नबंधनात अडकतात. कन्यारत्नाचे आगमन झाल्याने सुजय खूश असतो; पण यादरम्यान कंपनीची माहिती चोरून दुसऱ्याला दिल्याचा आरोप त्याच्यावर होऊन चौकशीचा ससेमिरा त्याच्या मागे लागतो; पण अखेर त्याची यातून सुटका होते आणि नोकरीही वाचते. या कादंबरीतून सामाजिक परिस्थिती, मानवी नाती, स्वभाव यांचे दर्शन होते.

पुस्तक : ऑफिशिअल सिक्रेट्स
लेखक : प्रतीक पाटील
प्रकाशन : वाचनकट्टा प्रॉडक्शन प्रा. लि. 
पृष्ठे : १७६
मूल्य : २२० रुपये

(‘ऑफिशिअल सिक्रेट्स’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link