Next
संत गजानन महाराजांची पालखी १५ जुलैला सोलापुरात
BOI
Wednesday, June 20 | 03:04 PM
15 0 0
Share this story

संत गजानन महाराजांच्या पालखीचे संग्रहित छायाचित्रसोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त शेगांवहून पंढरपूरला जाणाऱ्या संत गजानन महाराज पालखीचे १५ जुलै रोजी सायंकाळी जिल्ह्यात आगमन होणार आहे. १६ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता शहरात आगमन होणार आहे. पालखीने १९ जून रोजी शेगांव येथून पंढरपूरसाठी प्रस्थान केले आहे.

१६ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पाणी गिरणी चौकात पालखीचे आगमन होईल. शहरवासीयांतर्फे महापौर शोभा बनशेट्टी पालखीचे स्वागत करतील. गेल्या ५१ वर्षांपासून ६५० किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी सोलापूरहून पंढरपूरकडे जाते. सुमारे २५० वारकरी, २०० टाळकरी पालखीसोबत असणार आहेत.

पाणी गिरणी चौक ते तुळजापूर वेस, शिवगंगा मंदिर, बुधवार पेठ, सम्राट चौक, प्रभाकर महाराज मंदिर, बाळीवेस, चाटी गल्ली, मंगळवार पेठ पोलिस चौकी, कुंभार वेस, कोंतम चौक, कन्ना चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता पालखीचा कुचन प्रशालेत मुक्काम असणार आहे. १७ जुलै रोजी सकाळी पालखीचा मुक्काम उपलप मंगल कार्यालयात असेल, तर १८ जुलै रोजी पहाटे पालखी दमाणीनगरमार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link