Next
फोटोग्राफी सायकल क्लबतर्फे उन्हाळी छंद वर्ग
BOI
Monday, May 22, 2017 | 05:25 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील फोटोग्राफी सायकल क्लब संस्थेमार्फत मुलांसाठी आयोजित केलेला उन्हाळी छंद वर्ग सिंहगड रोड येथील ‘एस. के. फिटनेस सेंटर व डान्स अकादमी’ येथे नुकताच पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना फोटोग्राफी, म्युझिक, डान्स व ड्रामा यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

‘आजकाल अनेक उन्हाळी शिबीरे घेतली जातात, पण त्यात मुलांच्या आनंदाबरोबरच त्यांच्या भविष्यालाही पूरक ठरतील असे उपक्रम फारसे राबवले जात नाहीत. सध्या मुलांमध्ये मोबाईल, टी.व्ही., कम्प्युटर यांचे वेड वाढत चाले आहे, अगदी लहान मुलेही मोबाइल, व्हॉट्सअपच्या आहारी गेली आहेत, यामुळे मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचा छंद फारसा जोपासला जात नाही. शैक्षणिक ज्ञानासोबतच, जर लहानपणापासूनच एखादा छंद जोपासला गेला, तर वाढत्या वयात त्यांना कोणत्याही वाईट सवयी लागण्याचे प्रमाण कमी होईल,’ असे मत  संस्थेच्या तेजस्विनी थिटे यांनी व्यक्त केले.

आजकाल पालकांच्या वाढत्या वयातील मुलांबद्दल तक्रारी वाढल्याचे जाणवते. पालक लहानपणापासून फक्त शैक्षणिक वाढीवर भर देताना दिसतात, ज्यामुळे मुलांची सर्वांगीण प्रगती खुंटते. प्रत्येक मुलामध्ये काही विशेष कलागुण असतात, योग्य वेळी त्यांची जाणीव पालकांना झाली, तर मुलांचे यशस्वी करिअर घडणे ही फार मोठी बाब उरत नाही. याकरिता पालकांनी सतर्कतेने पुढाकार घ्यायला हवा. आपल्या मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना ओळखून, त्याला एखादा छंद जोपासण्यास प्रवृत्त केले पाहिजे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल साळवी यांनी पालकांना दिली.

फोटोग्राफी सायकल क्लबतर्फे असे समाजपूरक, पर्यावरणपूरक, अनेक उपक्रम सातत्याने राबविले जातात, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. यावेळी मुलांसोबत त्यांचे पालक, पंकज तोवर, सुजीत कदम व त्यांच्या पत्नी आणि अन्य कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search