Next
मध्य प्रदेशातील तरुणांना रोजगार देणार ‘यशस्वी’
प्रेस रिलीज
Friday, May 11 | 03:41 PM
15 0 0
Share this story

मध्य प्रदेशमधील एक लाख तरुणांना प्रतिवर्षी रोजगार देण्यासंदर्भात सामंजस्य करार प्रसंगी डावीकडून संजीव सिंह, हेमंत देशमुख, दीपक जोशी, सुखवीर सिंह व विश्वेश कुलकर्णी.पुणे : मध्य प्रदेशमधील बेरोजगार युवकांना समुपदेशन व योग्य मार्गदर्शनाद्वारे खासगी क्षेत्रातील विविध नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पीपीपी तत्वानुसार  पुणे येथील कौशल्य विकास व रोजगार क्षेत्रातील अग्रगण्य ‘यशस्वी’ या संस्थेला देण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधील १५ जिल्ह्यांतील सुमारे एक लाख बेरोजगारांना प्रति वर्षी रोजगार देण्याची जबाबदारी ‘यशस्वी’ला देण्यात आली आहे.

यासंदर्भातील सामंजस्य करार मध्य प्रदेशचे तंत्रशिक्षण, कौशल्य विकास व रोजगार मंत्री दीपक जोशी, मध्यप्रदेश  सरकारच्या कौशल्य विकास व रोजगार निर्माण मंडळाचे अध्यक्ष हेमंत देशमुख, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव व तंत्र शिक्षण व रोजगार विभागाचे प्रमुख अशोक वर्णवाल व मध्य प्रदेश रोजगार निर्माण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखवीर सिंह आदींच्या प्रमुख उपस्थितीत नऊ मे २०१८ रोजी भोपाळ येथे करण्यात आला.

रोजगार विभागाचे संचालक संजीव सिंह व ‘यशस्वी’चे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी या करारावर स्वाक्षरी केली.  केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करून अशा  स्वरूपाचा करार करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

‘भोपाळ, इंदौर, जबलपूर, रीवा, ग्वाल्हेर, सागरउज्जैन, होशंगाबाद, शहडोल, धार, खरगौन, देवास, सिंगरौली, सतना व कटनी या पंधरा जिल्ह्यांत हे रोजगार केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या १५  जिल्ह्यांमधील औद्योगिक विकास अधिक असल्याने या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे,’ असे मध्यप्रदेशचे तंत्रशिक्षण, कौशल्य विकास व रोजगार मंत्री दीपक जोशी यांनी सांगितले.

‘रोजगार संधी प्राप्त व्हाव्यात म्हणून व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य तसेच उद्योग क्षेत्रातील सध्याची परिस्थिती, नोकऱ्याचे बदलते स्वरूप व समुपदेशनसुद्धा करण्यात येईल; तसेच ठिकठिकाणी रोजगार मेळाव्यांचेही  आयोजन करण्यात येईल,’ असे ‘यशस्वी’चे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link