Next
ध्वज पुराण
BOI
Monday, December 11 | 11:39 AM
15 0 0
Share this story

ध्वज हे कोणत्याही देशाचे अथवा संबंधित समाजाचे मानचिन्ह मानले जाते. ध्वजालाही इतिहास असतो. ध्वज निवडीच्या घटना किंवा आख्यायिका ऐकू येतात. हा सर्व रोचक इतिहास राजेंद्र शेळके यांनी या पुस्तकात मांडला आहे. भारतात ज्या ज्या राजवटींनी ठसा उमटवला, त्या राजवटींचा ध्वजाच्या अनुषंगाने इतिहास ते सांगतात. भगव्या रंग असलेले ध्वज सातत्याने दिसतात, त्या रंगाची व्युत्पत्ती कशी झाली, ते समजते.

ध्वज किंवा निशाणे बदलत गेली असली, तरी त्यामागची भूमिका मात्र एकच आहे, असे दिसते. रावणाचा प्रसिद्ध ‘वीणा ध्वज’, कर्णाचा ‘नागकक्ष ध्वज’ आदी माहिती समजते. ध्वजांबरोबर अशोक स्तंभ, कार्ला येथील चैत्यगृह, शिल्पमंदिरे, अजिंठा लेणी आदींच्या साहाय्याने भाष्य केले आहे. ध्वजांची रंगीत छायाचित्रे पुस्तकाचे संग्राह्यमूल्य वाढवतात.

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १६५
किंमत : ४०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link