Next
‘बीएमडब्ल्यू’च्या नवीन मोटरसायकल्सचे प्री-बुकिंग सुरू
प्रेस रिलीज
Friday, June 08, 2018 | 11:56 AM
15 0 0
Share this article:

बीएमडब्ल्यू मोटोरॅड जी३१०आरमुंबई : बीएमडब्ल्यू मोटोरॅड इंडियातर्फे आठ जून २०१८पासून ‘बीएमडब्ल्यू जी३१०आर’ आणि ‘बीएमडब्ल्यू ३१०जीएस’ या भारतातील बहुप्रतिक्षित मोटरसायकल्ससाठी प्री-बुकिंग्ज सुरू होणार आहे. या मोटरसायकल्सच्या अधिकृत सादरीकरणाआधी ५० हजारांमध्ये ही मोटरसायकल प्री-बुक करता येणार आहे. मोटरसायकलचे प्री-बुकिंग देशभरातील कोणत्याही अधिकृत बीएमडब्ल्यू मोटोरॅड डीलरशीपमध्ये करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार डिलिव्हरी केली जाणार आहे.

मोटरसायकल्स प्री-बुक करण्यासाठी ग्राहक मोटोरॅड आऊटलेटला भेट देऊ शकतात किंवा वेबसाइटवर एन्क्वायरी फॉर्म ऑनलाइन भरून कॉल बॅकची विनंती करू शकतात.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे प्रेसिडेंट विक्रम पावाह म्हणाले, ‘बीएमडब्ल्यू मोटोरॅडकडे डिझायनिंग मोटरसायकल्सचा वारसा आहे, जी अद्वितीय रायडिंग प्लेझर, उत्तम परफॉर्मन्स व खात्रीदायक क्वालिटी यांचे अनोखे संयोजन एकत्रितपणे सादर करते. जेव्हा बीएमडब्ल्यू मोटोरॅडने सब-५००सीसी प्रीमियम सेगमेंटमधील आपल्या प्रवेशाची घोषणा केली, तेव्हा मोटरसायकल इंडस्ट्रीमध्ये खळबळ निर्माण झाली. बहुप्रतिक्षित ‘बीएमडब्ल्यू जी३१०आर’ आणि ‘बीएमडब्ल्यू जी३१०जीएस’सह बीएमडब्ल्यू मोटोरॅड भारतात केवळ प्रवेश करणार नाही, तर या सेगमेंटला पुनर्परिभाषित करणार आहे. या दोन्ही मोटरसायकल्स भारतीय रस्त्यांसाठी बनविण्यात आल्या आहेत आणि त्या खरा बीएमडब्ल्यू अनुभव रास्त दरांमध्ये घेऊ देणार आहेत. शेवटी आता प्रतिक्षा संपली आहे, कारण आमच्या ग्राहकांसाठी आम्ही लाँचच्या आधी प्री-बुकिंग्ज सुरू केल्या आहेत. आम्हाला खात्री आहे की, जगातील इतर देशांप्रमाणेच या दोन्ही मोटारसायकल्स भारतातही भरघोस यश प्राप्त करतील.’

नवीन लाँच करण्यात येणाऱ्या ‘बीएमडब्ल्यू जी३१०आर’मध्ये बीएमडब्ल्यू मोटारॅडमधील इनोव्हेशन, क्वालिटी व प्रबळ प्रोडक्ट सब्स्टान्स ही सर्व वैशिष्ट्ये सादर करण्यात आली आहेत. जागतिक बाजारपेठेसाठी खासकरून डिझाइन केलेली ही मोटरसायकल बीएमडब्ल्यू प्रीमियम महत्त्वाकांक्षेला ५०० सीसी सेगमेंटअंतर्गत सादर करते. ‘बीएमडब्ल्यू जी ३१०आर’मध्ये बीएमडब्ल्यू रोडस्टरचे खरे तत्त्व सामावलेले आहे आणि ही देशात व देशाबाहेर दोन्हीकडे डायनॅमिक परफॉर्मन्स आणि कम्फर्ट सादर करते.

बीएमडब्ल्यू ३१०जीएस‘बीएमडब्ल्यू जी३१०जीएस’ हा उत्साह पुढे टिपिकल जीएस क्षेत्रामध्ये नेत आहे. त्यामुळे दोन चाकांवर शानदार साहसी प्रवास अनुभवता येणार आहे. ही अशी आधुनिक मोटरसायकल आहे, जी परिपूर्ण आहे आणि सेगमेंटमध्ये अद्वितीय आहे. ही मोटरसायकल ट्रॅफिकमध्ये गतीशील व चपळ असली, तरीही कठीण अशा भूप्रदेशासाठीही अत्यंत मजबूत आहे. हिची चपळता रायडिंगचा पूर्णपणे नवीन अनुभव प्रदान करते.

या दोन्हींची विक्री व सर्व्हिसिंग बीएमडब्ल्यू मोटोरॅडच्या प्रीमियम डीलर नेटवर्कद्वारे करण्यात येईल, जे भारतातील दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद व कोची अशा महत्त्वाच्या सेंटर्समध्ये उपस्थित आहे. बीएमडब्ल्यू मोटोरॅडच्या चंदिगढ व कोलकातामधील आगामी डिलरशीप्स मोटरसायकल्सच्या सादरीकरणानंतर बुकिंग्ज स्वीकारायला सुरुवात करतील.

ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या बीएमडब्ल्यू मोटोरॅड मोटरसायकल्सची मालकी मिळवता यावी यासाठी बीएमडब्ल्यू फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया सानुकूल व लवचिक आर्थिक उपाय सादर करणार आहे. ग्राहक डिलिव्हरी होण्याआधीही त्यांचे लोन प्री-अॅप्रूव्ह्ड करून घेऊ शकतात.

ऑनलाइन बुकिंगसाठी : www.bmw-motorrad.in
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search