Next
‘छोटी मालकीण’च्या शीर्षक गीताला प्रेक्षकांची पसंती
प्रेस रिलीज
Wednesday, April 25 | 05:09 PM
15 0 0
Share this storyमुंबई :
मालिकेचे शीर्षक गीत हे त्या मालिकेची ओळख असते. रेवती आणि श्रीधर यांच्यातल्या अनोख्या नात्याचे चित्रण असलेल्या ‘छोटी मालकीण’ या ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेच्या शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. आदर्श शिंदेचा सुरेल आवाज, मनात रेंगाळणारी चाल आणि लोकगीताशी नाते सांगणारे शब्द असा उत्तम योग्य या शीर्षक गीतात जुळून आला आहे.

‘वाऱ्यावर पसरले सूर मखमली, मनामंदी झुलली माझ्या तुझी सावली, रानोवनी पानोपानी प्रीत जागली, नजरेला जेव्हा तुझ्या नजर भेटली’ असे या हे शीर्षक गीताचे शब्द आहे. या गाण्यातून छोटी मालकीण रेवती आणि श्रीधर यांच्यातली केमिस्ट्रीही दिसून येते. त्यांच्या अव्यक्त नात्याविषयीही हे गाणे खूप काही सांगून जाते.

नव्या दमाचे गीतकार वैभव देशमुख यांच्या शब्दांना संगीतकार देवेंद्र भोमेने संगीतबद्ध केले आहे. लोकप्रिय गायक आदर्श शिंदेने त्याच्या खास शैलीत हे गाणे गायले आहे. सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता वाजणाऱ्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे; तसेच हे गाणे अनेकांच्या मोबाईलची रिंगटोन झाले आहे. या गाण्याचे फिमेल व्हर्जन श्रुती आठवलेने गायले आहे.

शीर्षक गीताविषयी आणि स्टार प्रवाहसोबत असलेल्या नात्याविषयी आदर्श शिंदे म्हणाले, ‘स्टार प्रवाहबरोबर काम करताना अगदी घरच्यासारखे वातावरण असते. स्टार प्रवाहबरोबर चार-पाच मालिकांची गाणी मी गायलोय. स्टार प्रवाहने मला मोठे केले असेही म्हणता येईल. कारण, स्टार प्रवाहचा रिअॅलिटी शो ‘आता होऊन जाऊ द्या’मधून मी महाराष्ट्रासमोर आलो. त्यामुळे स्टार प्रवाहशी माझे कायमच छान सूर जुळतात. मी आजवर गायलेल्या गाण्यांत ‘छोटी मालकीण’ हे एक वेगळे आणि खास असे गाणे आहे. ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरते आहे याचा मला आनंद आहे.’

‘माझ्या पहिल्याच मराठी मालिकेसाठी शीर्षक गीत करण्याची संधी दिल्याबद्दल मी स्टार प्रवाह आभारी आहे. मी या पूर्वी एका हिंदी मालिकेचे शीर्षक गीत केले होते. ‘छोटी मालकीण’चे शीर्षक गीत करणे हे नक्कीच आव्हानात्मक होते. गाणे रोमँटिक असले, तरी त्याचा बाज लोकसंगीताचा आहे. आदर्शनेही या गाण्यासाठी ओपन व्हॉईस न लावता रोमँटिक व्हॉइस लावला आहे. त्यामुळे हे गाणे श्रवणीय झाले. हे गाणे प्रेक्षकांना आवडते ही माझ्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे,’ असे संगीतकार भोमे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link