Next
‘जीजीपीएस’मध्ये वाचन प्रेरणा दिन
BOI
Tuesday, October 16 | 03:29 PM
15 0 0
Share this story

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनाच्या तासिकेदरम्यान पुस्तके वाचताना शिक्षिका आणि विद्यार्थी

रत्नागिरी : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (जीजीपीस) वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. १५ ऑक्टोबर २०१८ रोजी राबवलेल्या या उपक्रमात पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी तब्बल २०० पुस्तके शाळेला देणगी म्हणून दिली.

काव्यवाचन करताना विद्यार्थिनीडॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तिदायी आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळा-महाविद्यालयांत डॉ. कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार येथील ‘जीजीपीएस’मध्ये हा दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांसाठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अवनी आठवले, अवंती काळे यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. चैतन्य परब आणि जान्हवी साळवी यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका समिधा बाष्टे आणि ऋता भिडे यांनी केले. काव्यवाचनात वैष्णवी बाष्टे, तीर्था पावसकर, अवनी धाक्रस, अपाला औंधकर यांनी भाग घेतला.

गीता भवन येथे भरविण्यात आलेले ग्रंथ प्रदर्शन पाहताना विद्यार्थी.

याविषयी अधिक माहिती देताना शिक्षिका बाष्टे म्हणाल्या, ‘शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, हे वाचन प्रेरणा दिनाचे उद्दिष्ट आहे. १५ ऑक्टोबरला शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. यात अभिवाचन स्पर्धा, काव्यवाचन यांचा समावेश होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कविवर्य मंगेश पाडगावकर, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्याविषयी माहिती सांगितली. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी गीता भवन येथे भरविण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.’

शाळेला पुस्तके भेट देताना पहिलीतील मुले.

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्राथमिक विभागाकडून जुनी पुस्तके देणगी म्हणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी विषयांतील तब्बल २०० पुस्तके देणगी म्हणून दिली. त्याचप्रमाणे पहिली ते पाचवीतली मुलांसाठी वाचनासाठी एक तासिका घेण्यात आली. यात प्राथमिक विभागाच्या प्रमुख विजया पवार आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी मुलांसोबत पुस्तकांचे वाचन केले.

हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link